मानोरा (Alcohol Prohibition Women Campaign) : तालुक्यातील शेंदोणा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडले असून महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेंदोणा येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी जोरदार एल्गार पुकारला असून त्यांनी थेट मानोरा पोलीस ठाणे गाठत निवेदन सादर केले.
निवेदनात गावातील अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान तसेच महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. गावातील अवैध दारूअड्डे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.
यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे (Alcohol Prohibition Women Campaign) अवैध दारू व्यवसायाविरोधातील जनआक्रोश पुन्हा एकदा समोर आला आहे. गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला. महिलांच्या या मागणीबाबत प्रशासन याबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार; शेंदोणा येथील महिला धडकल्या पोलीस ठाण्यावर
Alcohol Prohibition Women Campaign: शेंदोण्यात अवैध दारूविक्रीचे परिणाम वाटून महिलांनी गावातील अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर आक्रमक भुमिका घेतली.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Alcohol Prohibition Women Campaign