जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने
कन्हान (Senior Citizens Association) : "स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर" या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोरिल ग्रीन जिम येथे स्वच्छता मोहीम २०२६ अंतर्गत स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.
आज सकाळी ६ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोरिल ग्रीन जिम येथे जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम राबवुन स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेन्द्र शेंदरे यांनी संपुर्ण ग्रीन जीम दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यकत करण्यात आले.

स्वच्छता मोहिमेत नगरपरिषद सफाई कर्मचारी, स्वच्छता समन्वयक मयुर डफरे व ज्येष्ठ नागरिक संघ कन्हान चे नारायण गजभिये, किशोर अरोरा, बालाजी नायर, छगन वानखेडे, तेजपाल वाघमारे, रमाकांत नागपुरे, सुशील कळमकर, पत्रकार मोहम्मद शफीक शेख, प्रभु बावनकर, सोनवणे आणि जागृती जेष्ठ नागरिक संघट ना कन्हान अध्यक्ष बाबुवन घोडमारे, उपाध्यक्ष भगवान लांजेवार, सचिव संजय करंडे, सहसचिव विठ्ठलराव मानकर, कोषाध्यक्ष विठ्ठलराव बोरकर, सदस्य तारा चंद निंबाळकर, रमेश चव्हाण, दामोधर बंड, मधुकर कुंभलकर, प्रभाकर रूंघे सह नागरिक उपस्थित होते. तसेच नगरसेविका सुश्री रेखा टोहणे यांनी सुद्धा भाग घेतला. नगराध्यक्ष, नगरसेविका, जेष्ठ नागरिक या सर्वां नी स्वच्छता मोहीम सतत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सर्वांचे स्वागत आणि आभार ज्येष्ठ नागरि क संघाचे सचिव प्रकाश नाईक यांनी व्यक्त केले.