हिंगोली (Sengaon Burglary) : सेनगाव शहरातील इंदिरा नगर भागात घरफोडीची घटना घडली. ज्यामध्ये सोन्या चांदीचा ऐवज रोकड व मोबाईल असा एकुण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव शहरातील इंदिरा नगर भागात दिपसिंग छोटूसिंग सुरकेटाक यांचे निवासस्थान आहे. ३ ते ४ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत कोणी तरी अज्ञात चोरट्याने दिपसिंग सुरकेटाक यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील ३० हजार रुपये किमतीचा १ तोळ्याचा सोन्याचा नेक्लेस, १५ हजार रुपयाचे ५ ग्रॅमचे सोन्याचे सेवनपीस, १५ हजार रुपयाची ५ ग्रॅमची १ सोन्याची पोत, १५ हजार रुपयाचे १ सोन्याचे ७ ग्रॅमचे मंगळसूत्र, ३ हजार रुपयाचे १२ तोळ्याचे चांदीचे चैन, २ हजार रुपयाचे ३ तोळ्याच्या ६ चांदीच्या अंगठ्या ५ हजार रुपयाचे २ मोबाईल, नगदी २ लाख ५५ हजार रुपये असा एकुण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी सेनगाव पोलिस ठाण्यात दिपसिंग सुरकेटाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक खंदारे, सुभाष चव्हाण व ठसे तज्ञांनी भेट दिली. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे हे करीत आहेत.
सेनगावात घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज व रोकड पळविली...
Sengaon Burglary: सेनगाव शहरातील इंदिरा नगर भागात घरफोडीची घटना घडली. ज्यामध्ये सोन्या चांदीचा ऐवज रोकड व मोबाईल असा एकुण ३ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने..
Sengaon Burglary
संबंधित सामग्री
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला लुटले
वसमत येथील पंचशील नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाला चोरांची भीती दाखवून व पोलीस असल्याची बतावणी करून लुटण्याची घटना शुक्रवारी घडली.
पोलिस कर्मचार्यांला मारहाण करून शासकीय कामात अडथळा
Police Officer Assault: सेनगाव पोलिसांना चार जणांनी मार्हाण करण्यामुळे शासकीय कामावर अडथळा आला. त्यांची अटक झाली आहे आणि तपास सुरू आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.
सामान उचलून घेण्याच्या कारणातून महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
woman modesty Case: सनगाव तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय स्त्रीच्या घरासमोर सामान उचलण्याच्या काळात त्याच्या चौघा त्याला मारहाण करताना धाव घेऊन आले.
सेनगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सपोनी संग्राम जाधव: अवैध धंदे व गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईचे संकेत
API Sangram Jadhav: सेनगाव पोलीस ठाण्यावर नव्या प्रभारीपदाची नियुक्ती झाली. सांग्राम जाधव यांचे नेतृत्व कायद्याच्या अंमलबजावणीत व अवैध धंदांवर नोकरी करेल.