दिव्यांग रास्ता रोको

दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

Divyangg Rasta Roko: सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा

दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

Divyangg Rasta Roko

सेनगाव पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा; प्रहार संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सेनगाव (Divyangg Rasta Roko) : सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

प्रहार संघटना जिल्हा प्रमुख विजय वानखेडे, तालुका प्रमुख बालाजी गायकवाड यांच्या सह कार्यकत्यांनी  दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, सेनगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींनी सन २०२५-२६ तसेच त्यापूर्वीच्या कालावधीतील दिव्यांग बांधवांसाठीचा शासन नियमानुसार पाच टक्के निधी वितरित केलेला नाही, अशा ग्रामपंचायतींना पंचायत समितीने तातडीने आदेश द्यावेत. संबंधित निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पंचायत समितीमार्फत आदेश देऊनही निधीचे वाटप करण्यात आले नाही किंवा शासन निर्णयानुसार दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, तर संबंधित ग्रामपंचायतींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सेनगाव-रिसोड महामार्गावर दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन लोकशाही व शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. या (Divyangg Rasta Roko) आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सोळंके यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत द्या

Raising Solanke: मलकापूर तालुक्यातील काटी येथे दरोडेखोरांशी झुंज देताना जीव गमावलेल्या रायसिंग सिताराम सोळंके यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने १० लाख रुपयांचा सहाय्यता निधी द्यावा, अशी मागणी

Aug 14, 2026
कर्तव्यावर असताना हल्ल्यात मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत मंजूर

कर्तव्यावर असताना हल्ल्यात मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत मंजूर

Talathi death case: हिंगोलीच्या तलाठीच्या संतोष पवार यांचा मृत्यू आडगाव रांजेबुवा तालाथी कायमकाम करीत असतानाच झाला. राजकारणाने त्यांचे कुटुंब ५० लाखांची मदत

Aug 02, 2026
वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

Sambhaji Brigade Protest:  संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलन

Jul 25, 2026