संगित साधना विद्यालय

संगिताचे धडे दिलेल्या विद्यालयात आगीचे तांडव; कुटूंब बचावले

Sangit Sadhana Vidyalaya: शहरातील मारवाडी गल्लीत ५ ऑक्टोबर सोमवार, रोजी सायंकाळी गोपाल बासटवार यांच्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीने ८० वर्षीय ज्येष्ठ संगीत साधिका अनुराधाताई नांदेडकर

संगिताचे धडे दिलेल्या विद्यालयात आगीचे तांडव; कुटूंब बचावले

Sangit Sadhana Vidyalaya

 

तंबोरा, हार्मोनियमसह घर भस्मसात; अर्धवट जळालेली साहित्य पाहून शिष्यमंडळींचे डोळे पाणावले

हिंगोली (Sangit Sadhana Vidyalaya) : शहरातील मारवाडी गल्लीत ५ ऑक्टोबर सोमवार, रोजी सायंकाळी गोपाल बासटवार यांच्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीने शेजारी राहणार्‍या ८० वर्षीय ज्येष्ठ संगीत साधिका अनुराधाताई नांदेडकर यांचे घरही कवेत घेतले आणि काही क्षणात संपूर्ण संसार भस्मसात झाला.

अनुराधाताई गेल्या अनेक दशकांपासून संगीत साधना विद्यालय चालवतात. शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचा मोठा नावलौकिक असून त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. या वयातही त्या शिष्यांना संगीताचे धडे देतात. आगीत  नांदेडकर कुटूंबीय अडकले. यामध्ये शैलेश नांदेडकर याला आगीमुळे मोठी दुखापत झाली. परंतु घरामध्ये असलेली आई अनुराधाताई व पत्नी श्वेता यांना सुखरूप बाहेर काढण्याकरीता शैलेशने घरामध्ये धाव घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या घरामागून दरवाजा असल्याने नांदेडकर कुटूंबीय सुखरूप घराबाहेर पडले.

परंतु डोळ्यासमोर अग्नितांडव होत होता. अशा परिस्थितीत नांदेडकर कुटूंबीयांचे पाय घरातून बाहेर निघेणासे झाले होते. या आगीत तंबोरा, हार्मोनियम, तबला, गिटारसह सर्व संगीत साहित्य जळून खाक झाले. घरातील फ्रिज, टीव्ही, पंखे, कपडे, धान्य, कागदपत्रे काहीही शिल्लक राहिले नाही. घटनेच्या वेळी अनुराधाताई व त्यांच्या स्नुषा श्वेता नांदेडकर घरात काम करीत होत्या. फटाक्यांचे आवाज वाढताच आग लागल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांचा मुलगा शैलेश यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही महिलांना मागील दाराने बाहेर काढल्याने अनर्थ टळला. मंगळवारी सकाळी शिष्यांनी घटनास्थळी भेट दिली असता जळालेले वाद्य, तबल्याचे अवशेष आणि अर्धवट जळालेली साहित्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.