खा. संजय जाधव

परभणीत बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अबाधीत ठेवणार: खा. संजय जाधव

MP Sanjay Jadhav: परभणीत खा. संजय जाधव व माजी हरिभाऊ लहाने यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्याऐवजी शिवसैनिकांसाठी नेट्रो कार्यक्रमाची सुरुवात

परभणीत बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अबाधीत ठेवणार: खा. संजय जाधव

MP Sanjay Jadhav

 

शिवसेनेचा संवाद मेळावा, खा.संजय जाधव आ. सईद खान यांचा सत्कार

परभणी (MP Sanjay Jadhav) : सेलू येथे मराठी माणसावरील अन्यायाच्या विरोधात व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुबंई मध्ये शिवसेनेच्या रूपाने लावलेले रोपटे त्यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन असंख्य शिवसैनिकांच्या प्रयत्नातून  वटवृक्ष झालेला आहे. ती शिवसेना  अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी शिवसेनेच्या वतिने आयोजीत संवाद मेळाव्यात केले.

हा मेळावा साई नाट्यगृह येथे शूक्रवार ३ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी खा.सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, लोकसभा संपर्क प्रमुख राजू कापसे, माजी जिल्हा प्रमुख भास्कर लंगोटे, विनायक खंडागळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे,   मंगल कथले, पंडितराव अरकुले, रणजित गजमल, उपजिल्हाप्रमुख बाबा काटकर, न.प.गटनेते संदीप लहाने, नगर सेवक डॉ.अनिकेत जोगदंड, नगरसेविका अनुपमा देवधर, सपना काळे  आदींची उपस्थिती होती. यावेळी पूढे बोलताना खा. जाधव (MP Sanjay Jadhav) पुढे म्हणाले की, मी पूर्वीपासून शिवसेनेचा होतो  व आजही शिवसेनेचा आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा विचार  सतत शिवसेनाप्रमुखांनी घालून दिलेला आहे.

त्या विचाराने प्रेरित होऊनच शिवसैनिक काम करतात. मी देखील आतापर्यंत पक्षाशी बांधीलकी ठेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षाची ध्येय धोरणेच बदलल्यामुळे व कामे होत नसल्यामुळे  कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचत गेले. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव जड अंतकरणाने मला हा निर्णय घ्यावा लागला. वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली शिवसेना जिल्ह्यात टिकावी यासाठी पक्षप्रवेश करावा लागला. जुन्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे विचारात घेऊन व त्यांना नक्कीच  मानसन्मान दिला जाईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हा सत्कार समारंभ तसेच संवाद सोहळा खूप छान पद्धतीने आयोजित केल्याबद्दल न. प. गटनेते संदीप लहाने यांना कौतुकाची थाप दिली.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, वैâ.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खा.संजय जाधव यांचा शाल ,श्रीफळ व पांडुरंगाची प्रतिमा  देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संदीप लहाने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष मोहकरे तर आभार रामेश्वर बहिरट यांनी मानले. यावेळी तालूक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिवसेनेचे नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या   आषाढी वारीतील वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य  सुविधा मिळावी यासाठी फिरते रुग्णालयाच्या फलकाचे उद्घाटन यावेळी खा.जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

मित्र पक्षाकडून दूजाभाव: माजी आ. हरिभाऊ लहाने

विधानसभा निवडणूकीत मित्रपक्ष भाजपाचे उमेदवार यांचे काम केले. परंतू वेळोवेळी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाकडून डावलले जात आहे. स्थानिक निवडणूका असो का विकास कामे असोत शिवसेनेला महत्व दिले जात नसल्याची खंत यावेळी माजी आ.लहाने यांनी व्यक्त केली. दरम्यान शिवसैनिक लढण्यास तयार आहेत परंतु त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा पाहिजे होता व तो खा. जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या रूपाने मिळाला आहे. शिवसेना प्रमुखांचे  ज्वलंत विचार  आज  शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या रूपाने समोर येत आहे. शिवसेनेचे तत्व स्वीकारून कोणी पक्ष प्रवेश  करत असेल तर त्याचे स्वागतच आहे. आपण आतापर्यंत  कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले असल्याचे यावेळी माजी आ. लहाने यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

खा. शिंदे यांच्या दौऱ्यावरून आष्टीकर, खराटे यांच्यात राजकीय ठिंणगी 

खा. शिंदे यांच्या दौऱ्यावरून आष्टीकर, खराटे यांच्यात राजकीय ठिंणगी 

Mahur Assembly Constituency: दोन्ही शिवसेनांमधील पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे या दौऱ्यादरम्यान ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका

Jul 02, 2026
'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

'गद्दारीला माफी नाही', हिंगोलीत पाऊल ठेवल्यास खासदार आष्टीकरांचे तोंड काळे करू

ShivSena Parmeshwar Mandge: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, खासदार नागेश पाटील आष्टीकराला गद्दारीची आरोप करत शिवसेनेच्या विरोधात इशारा देऊन हिंगोलीत गाजावाजा सुरू

Jun 23, 2026
वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल!

वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल!

Increased property taxes: शिवसेने चिखलीच्या शहरप्रमुखाने शुक्रवारी कर वाढीवर विरोध करून नगर परिषदेचे आकारणी निवेदन दिले. महागाई, बेरोजगारीमुळे आर्थिक दबावात असलेल्या नागरिकांचा तत्काळ पुनरुचार मागितला

Jun 19, 2026