रिसोड मृतदेह

पिकपमध्ये मृतदेह आढळल्याने रिसोड शहरात एकच खळबळ

Risod dead body: उभ्या असलेल्या एका पिकपमध्ये मृतदेह आढळल्याने रिसोड शहरात एकच खळबळ उडाली. हि घटना दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातील वाणी स्पशानभूमीच्या गेट समोर

पिकपमध्ये मृतदेह आढळल्याने रिसोड शहरात एकच खळबळ

Risod dead body

रिसोड (Risod dead body) : उभ्या असलेल्या एका पिकपमध्ये मृतदेह आढळल्याने रिसोड शहरात एकच खळबळ उडाली. हि घटना दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातील वाणी स्पशानभूमीच्या गेट समोर उघडकीस आली. पिकप क्रमांक एम एच 37 बि 1968 मेधे असलेल्या सदर मृतदेहातून अत्यंत दुर्गंध येत असल्याने सदर प्रकार उघडकीस आल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीला सदर मृतदेहाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते.

शहरात ही बाब वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.मात्र बघण्यासाठी आलेला प्रत्येक नागरिक तेथून दूर जात होता. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, पो का रवि इरतकर,पो का ज्ञानेश्वर बेले यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली व शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान रिसोड पोलीस समोर असताना रिसोड पोलिसांनी काही तासातच सदर मृतदेहाची ओळख पटविली.

रामेश्वर उर्फ रामू विष्णु शिंदे वय 45 वर्ष राहणार मोहजा इंगोले तालुका रिसोड जिल्हा वाशिम असे मतकाचे नाव असून उभ्या असलेल्या पिकप मध्ये त्याचा मृतदेह आलाच कसा याबाबत रिसोड पोलीस तपास करत आहे.मात्र याबाबत एक माहिती मिळाली असता त्यानुसार सदर पिकप हा गेली काही दिवसापासून वाणी स्मशानभूमीच्या गेट समोर उभा होता. मृतकास दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन सदर पिकप मध्ये झोपला असेल व त्याचा मृत्यू झाला असेल,मात्र पिकप चा चालक-मालक गेली काही दिवसापासून त्याने सदर पिकप हलवला नसल्याने ही बाब उघडकीस आली नसल्याची चर्चा वर्तवली जात आहे. सदर प्रकरणाचा तपास रिसोड पोलीस करत आहे.

संबंधित सामग्री

गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी आदेश दिले.

Sep 12, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..

Aug 30, 2026
बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळले; घटनेने खळबळ

बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळले; घटनेने खळबळ

Bokhara Gram Panchayat Infant: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अंदाजे चार ते पाच महिन्यांचे अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ

Aug 23, 2026
नागपुरात मोक्षधाम रेल्वे लाईन परिसरात आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

नागपुरात मोक्षधाम रेल्वे लाईन परिसरात आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

Nagpur dead body: नागपूर शहरातील मोक्षधाम रेल्वे लाईन परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे लाईन परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती

Aug 11, 2026
परभणीत मंदिर-शाळेसमोरच अवैध दारू विक्री? सावंगी भांबळेतील ग्रामस्थांचा संताप; तातडीच्या कारवाईची मागणी

परभणीत मंदिर-शाळेसमोरच अवैध दारू विक्री? सावंगी भांबळेतील ग्रामस्थांचा संताप; तातडीच्या कारवाईची मागणी

Parbhani Illegal Liquor: जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी भांबळे येथे तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक बाब

Aug 02, 2026