Revenue Department

कर्तव्यावर असताना हल्ल्यात मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत

कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारने विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

कर्तव्यावर असताना हल्ल्यात मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाखांची मदत

Revenue Department

हिंगोली : कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झालेल्या महसूल कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारने विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रांजे सज्जातील ग्राम महसूल अधिकारी कै. संतोष देवराव पवार हे २८ ऑगस्ट २०२४ रोजी शासकीय कामकाज करत असताना कार्यालयातच झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. पवार हे वसमत तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत होते.

या घटनेनंतर हिंगोलीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला होता. कर्तव्यावर असताना झालेल्या हल्ल्यात प्राण गेल्याने त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने कै. संतोष देवराव पवार यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला ५० लाख रुपये सानुग्रह सहाय्य म्हणून प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे.

यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. महसूल विभागाचे सहसचिव संजय र. बनकर यांनी यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित केला आहे.

काय होते ते प्रकरण?

आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात तलाठी संतोष पवार हे २८ ऑगस्ट २०२४ (बुधवार) रोजी कार्यालयीन कामकाज करीत असताना दुपारी सुमारे १२.३० वाजता एका व्यक्तीने कार्यालयात येऊन त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची केली. त्यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात टाकून धारदार शस्त्राने वार करत घटनास्थळावरून पलायन केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष पवार यांना दिलीप चव्हाण यांच्या वाहनातून परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तलाठी बालाजी डवरे यांनी हट्टा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप जगन्नाथ कर्‍हाळे (रा. बोरी सावंत) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर तलाठी संघटनेने विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले होते. मृत तलाठी संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची एकरकमी मदत तसेच त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026