रिसोड बाजार समिती

रिसोड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

Risod Bazar Samiti: रिसोडच्या स्थानिक कृषी बाजार समितीने २२ मेपासून कामकाज बंद केले होते, परंत्ये शेतकऱ्यांची आर्थिक हानि कमीत कमी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत

रिसोड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

Risod Bazar Samiti

रिसोड (Risod Bazar Samiti) : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पत्रक काढून दिनांक २२ मे २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बाजार समितीचे कामकाज बंद राहील असे जाहीर केले होते. ऐन हंगामाच्या काळात बाजार समिती बंद असल्याकारणाने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. शेतकऱ्यांचे हेच हित लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोड तर्फे बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

​अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रदेश संघटन मंत्री अभय खेडकर व जिल्हा अध्यक्ष जुगल किशोर कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन (Risod Bazar Samiti) बाजार समितीचे सभापती व सचिव यांना सादर करण्यात आले.

२९ मे पासून बाजार समिती सुरू करण्याचे आश्वासन
​बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांची होणारी कोंडी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर व सचिव विजय देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले. तसेच, सकारात्मक चर्चा करून दिनांक २९ मे पासून बाजार समिती पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रिसोड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
​
निवेदन देतेवेळी उपस्थित पदाधिकारी:
​या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते:
​प्रभाकर पाटील (रिसोड तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत)
​संतोष वाघमारे (ग्राहक संरक्षण परिषद)
​जयंत वसमतकर (जिल्हा कोषाध्यक्ष)
​अरुण लोथे (तालुका उपाध्यक्ष)
​विजय देशमुख (तालुका सचिव)
​सतीश मांदळे (कार्यालय मंत्री)

संबंधित सामग्री

ढासगड येथे ‘देशोन्नती’ वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन; शेतकरी-शेतमजुरांचा उत्स्फूर्त सहभाग

ढासगड येथे ‘देशोन्नती’ वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन; शेतकरी-शेतमजुरांचा उत्स्फूर्त सहभाग

Dainik Deshonnati Varadhapan: दैनिक देशोन्नतीच्या वर्धापन दिन पंधरवड्यानिमित्त दररोज प्रकाशित होत असलेल्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार (७ ऑगस्ट) रोजी कोरची तालुक्यातील पर्यटन स्थळ ढासगड

Aug 07, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क नाही..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क नाही..

Farm Loan Waiver Scheme: ही सेवा पूर्णतः विनामूल्य असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Jul 28, 2026
हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Hudukdooma lightning Death: कोरचीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या हूडूकदूमा येथे 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली.

Jun 28, 2026
शेतकऱ्यांच्या डिझेल टंचाईसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचा एल्गार

शेतकऱ्यांच्या डिझेल टंचाईसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचा एल्गार

​​​​​​​खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डिझेल मिळण्यात येत असलेल्या अडचणींची दखल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी गांभीर्याने घेतली.

May 23, 2026
प्रशासकीय नियोजन आणि लोकसहभागाचा विजय; पाचंबा गावाची शंभर टक्के 'स्व-जनगणना' पूर्ण

प्रशासकीय नियोजन आणि लोकसहभागाचा विजय; पाचंबा गावाची शंभर टक्के 'स्व-जनगणना' पूर्ण

Resode Census 2027: शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्व-जनगणना' मोहिमेत रिसोड तालुक्यातील पाचंबा गावाने उल्लेखनीय यश मिळविले

May 14, 2026