हिंगोली (Red Ribbon Club Training) : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली आज डापकू सभागृहात रेड रिबन क्लब प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सोळा महाविद्यालयांमधील रेड रिबन क्लबचे नोडल अधिकारी व पिअर एज्युकेटर या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन तरुणांमध्ये एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी व त्यांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी रेड रिबन क्लबची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी केली जाते व एचआयव्ही हद्दपार करण्यासाठी सर्वांचा सहभाग कसा गरजेचा आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
या (Red Ribbon Club Training) प्रशिक्षणाला डॉ. अरुण दमकोंडवार, प्रथमेश गोगटे, प्रा. खुशाल जाधव, ए. एन. यादव, डॉ. श्वेता आचार्य, डॉ. तुकाराम हापगुंडे, डॉ. जी. पी. भालेराव, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. पी. एन. कऱ्हाळे, डॉ. रेविता कवले, डॉ. एम. बी. डोळचाटे यांच्यासह मोठ्या संख्येने पिअर एज्युकेटर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संजय पवार, श्रीमती टिना कुंदनानी व आशिष पाटील यांनी परिश्रम घेतले.