रस्ता सुरक्षा अभियान

“मोबाईल नको, सुरक्षित प्रवास हवो&quot, रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

Road Safety Campaign: हिंगोलीत वाढत्या अपघातांच्या नियंत्रणासाठी पोलीस व वाहतूक शाखेने विशेष जनजागृती अभियान सुरू केला. मोबाईल वापरणे व वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन.

“मोबाईल नको, सुरक्षित प्रवास हवो&quot, रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

Road Safety Campaign

हिंगोली जिल्हा पोलिसांचे आवाहन

हिंगोली (Road Safety Campaign) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन हिंगोली जिल्हा पोलीस व शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान तीव्र केले आहे. “वाहन चालवितांना मोबाईल फोन वापरू नका” आणि “Drive Slow... Stay Safe” या मुख्य संदेशासह जिल्हाभर फलक, पोस्टर आणि शाळा- महाविद्यालयांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 “तुमचा मोबाईल कुठेही जाणार नाही... पण वाहन मात्र नक्की जाईल” या घोषवाक्यास पोलिसांनी निदर्शनास आणले की एका सेकंदाचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. वाहन चालवताना कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होते व अपघाताची शक्यता ४ पट वाढते. “Obey the sign or pay the fine. Drive within the speed limit!” असा इशारा देत वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले की वेगमर्यादा पाळणे हीच स्वतःची व इतरांची सुरक्षा आहे. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व शाळांजवळ वेग कमी ठेवणे बंधनकारक आहे.

आपत्कालीन... रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करा” असे आवाहन करत पोलिसांनी सांगितले की अँम्ब्युलन्सचा सायरन ऐकताच डावीकडे वाहन घेऊन मार्ग मोकळा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. एक मिनिटाचा उशीरही रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो.  “सड़क पर चलते समय, फोन इस्तेमाल ना करें. सतर्क रहें, सुरक्षित रहें” या संदेशातून पादचाऱ्यांनीही रस्ता ओलांडताना मोबाईल न वापरण्याचे व झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी सांगितले की, “Road safety is everyone's responsibility. Stay focused, be aware of the surroundings and follow traffic rules.” गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६०% अपघातांचे कारण मोबाईलचा वापर व अतिवेग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाईसोबतच जनजागृतीवर भर दिला जात आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार (Road Safety Campaign) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास ₹५,००० पर्यंत दंड व परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते. अतिवेगासाठी ₹२,००० पर्यंत दंड आकारला जातो. रुग्णवाहिकेला मार्ग न दिल्यास ₹१०,००० दंड व ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. “लवकर निघा... हळू चालवा... सुरक्षित रहा” हा मंत्र लक्षात ठेवा. तुमची एक चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा व इतरांनाही करायला सांगा. 

हिंगोली पोलीस दलाने सर्व नागरिक, शाळा, सामाजिक संस्था व वाहनचालक संघटनांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026