पातूर (State Abacus Competition) : नुकत्याच संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जि चॅम्प ऑफलाईन आणि ऑनलाईन अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या एकूण ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांनी यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्या मध्ये १२ सुपरस्टार, ११ फर्स्ट रँक, ७ सेकंड रँक आणि ६ थर्ड रँक मिळवत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.
या (State Abacus Competition) संपूर्ण यशामागे रामानूजन क्लासच्या संचालिका सौ. मीताली काळपांडे तसेच श्री. विलास काळपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा Best Franchise Award, Best Teacher Award तसेच Rising Star Award देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीसह पालकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याची संचालक आणि संचालिका यानीं भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
State Abacus Competition: राज्यस्तरीय जि चॅम्प ऑफलाईन आणि ऑनलाईन अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी
State Abacus Competition
संबंधित सामग्री
शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास 1 अधिकारी
Officer Amol Ambhore: एक शेतकरी कुटुंबातून शिक्षण पूर्ण करून, शिक्षक म्हणून काम करत असतानाच अमोल अंभोरे यांनी MPSC परीक्षेत यश मिळवून सहाय्यक आयुक्त पदावर निवडून मानाचा तुरा
जेईई मुख्य परिक्षेत भर जहागीरच्या सात्विक गरकळ चा डंका..!
JEE Satwik Garkal: सात्विक गरकळने JEE मुख्य परीक्षेत 99.42 गुणांसह AIR 9296 च्या स्थानावर येऊन उत्कृष्ट यश संपादन केले. त्याच्या यशामुळे कुटुंब आणि मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.