हिंगोली (Govt Medical College) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शुक्रवारी ८ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, रुग्णसेवा, बाह्यरुग्ण विभाग, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एनक्यूएएस नामांकन प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण नोंद व्यवस्थापन, औषध उपलब्धता, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विविध विभागांना भेट देत तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या (Govt Medical College) भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजहंस हणमंते, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे, मेट्रन बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक मेट्रन श्रीमती रागिणी जोशी, श्रीमती आशा क्षीरसागर, सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
एनक्यूएएस नामांकनाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट
Govt Medical College: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट देऊन त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि सुविधा सुधारण्यासाठी सूचना दिल्या.
Govt Medical College
संबंधित सामग्री
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार
Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू
Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना