President Droupadi Murmu

'मोठी स्वप्ने पाहा..'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मोठी स्वप्ने पाहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा

'मोठी स्वप्ने पाहा..'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

President Droupadi Murmu

राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचे आत्मीय स्वागत; भविष्यातील ध्येय जाणून घेत साधला मनमोकळा संवाद

गडचिरोली (President Droupadi Murmu) : "मोठी स्वप्ने पाहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. विद्यार्थ्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. नाव, गाव, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयाविषयी विचारपूस करत देशाच्या प्रथम नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. हा संवाद विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली शैक्षणिक सहलीत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील ९६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. काल राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचे उबदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे नाव, ते कोणत्या गावातून आले आहेत, कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहेत आणि भविष्यात काय बनण्याची इच्छा आहे, याची उत्सुकतेने विचारपूस केली.

संवादादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव येथील एका विद्यार्थ्याने, "मी भविष्यात शिक्षक बनणार आहे," अशी इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्याचे ध्येय ऐकून राष्ट्रपतींनी त्याचे कौतुक केले आणि शिक्षणात सातत्य, मेहनत व चिकाटी ठेवून मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. राष्ट्रपतींच्या या आत्मीय संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

राष्ट्रपती भवनाची सफर; ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव

भेटीनंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातील विविध ऐतिहासिक दालने, भव्य वास्तू, परिसर आणि अन्य महत्त्वाच्या भागांची विशेष सफर घडविण्यात आली. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेचे कार्य, राष्ट्रपती भवनाचा इतिहास आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य यांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली. राष्ट्रपती भवन प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या आदरातिथ्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

दिल्ली शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार तसेच राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देत आहेत. या भेटींमधून विद्यार्थ्यांना देशाची लोकशाही व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षणाच्या संधींची व्यापक माहिती मिळत आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026