रुजू झालेल्या नूतन अधिकाऱ्यांचा अनेकांकडून सत्कार
हिंगोली : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंतापदी दिनेश रोटे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपकार्यकारी अभियंता शेख अझीम यांनीही पदभार स्वीकारला आहे.
सध्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये नवनवीन अधिकारी रुजू होत आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंतापदी दिनेश रोटे व उपकार्यकारी अभियंतापदी शेख अझीम यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी कंत्राटदार सुजित विडोळकर यांनी दोघांचा सत्कार केला. याप्रसंगी उपअभियंता गजानन खोरणे, रवि उबारे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.