कुंभार बांधव माती रॉयल्टी

कुंभार बांधवांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ; मोफत इलेक्ट्रिक चाक आणि माती मळणी यंत्र मिळणार

Potter Community Clay Royalty: कुंभार समाजातील मातीची भांडी व अन्य वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

कुंभार बांधवांसाठी मातीवरील रॉयल्टी माफ; मोफत इलेक्ट्रिक चाक आणि माती मळणी यंत्र मिळणार

Potter Community Clay Royalty

 

पात्र लाभार्थ्यांना कुंभार ओळखपत्रांचे वाटप

खुलताबाद (Potter Community Clay Royalty) : कुंभार समाजातील मातीची भांडी व अन्य वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याशिवाय समाजातील पात्र महिला व पुरुष कारागिरांना शासनाच्या माध्यमातून कुंभार ओळखपत्रे देण्यात येत आहेत. या निर्णयामुळे पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना मिळण्यासह कारागिरांना आर्थिक आधार मिळणार आहे.

राज्यस्तरीय कुंभार समाजाच्या कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थी गोकुळ भागीनाथ मरकड यांना कुंभार ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय जोरले, कुंभार संघटनेचे ज्येष्ठ नेते उमाकांत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रामदास इंगळे, नगरसेवक सुरेश मरकड, प्रदेश उपाध्यक्ष मनोहर तागंडे, सरचिटणीस मनोहर मरकड, अर्थनियोजन अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हसके, मुरलीधर तिडके, शहराध्यक्ष प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

आधुनिक साधनांसाठीही शासनाची मदत

पारंपरिक कुंभार व्यवसायाला (Potter Community Clay Royalty) आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य शासनाकडून कारागिरांना इलेक्ट्रिक कुंभार चाक, माती मळणी यंत्र तसेच अन्य आवश्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मातीची भांडी तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

या (Potter Community Clay Royalty) योजनेचा लाभ घेण्यासाठी समाजबांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित तहसील कार्यालयातून कुंभार ओळखपत्र प्राप्त करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामदास इंगळे आणि नगरसेविका कांता सुरेश मरकड यांनी केले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गोकुळ मरकड यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उमाकांत सूर्यवंशी, नगरसेवक सुरेश मरकड आदी उपस्थित होते.