Poor Quality Road Work

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट; कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची शिफारस

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई व ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस जि.प. बांधकाम विभागाने केली.

गिरोली-कारपा रस्त्याचे काम निकृष्ट; कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची शिफारस

Poor Quality Road Work

कारपेट व सीलकोट उखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी; भविष्यात कामे देण्यास प्रतिबंध करण्याचीही मागणी

मानोरा : तालुक्यातील मौजे गिरोली ते कारपा या रस्ता सुधारणेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील कारपेट आणि सीलकोट पूर्णपणे उखडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटदाराने दोष दूर करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर तातडीने दंडात्मक प्रशासकीय कारवाई करावी, तसेच भविष्यात कामे देण्यास प्रतिबंध घालावा, अशी शिफारस जि.प. बांधकाम उपविभाग, कारंजा यांनी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

मौजे गिरोली ते कारपा (ग्रा.मा. ७९, किमी ०/३०० ते १/३००) या रस्ता सुधारणा कामाचा कार्यारंभ आदेश मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा येथील कंत्राटदार सुमित सुनिल हरणे यांच्या नावे देण्यात आला होता. मात्र, काम करताना आवश्यक दर्जा राखला गेला नसल्याने रस्त्यावरील कारपेट आणि सीलकोट मोठ्या प्रमाणात उखडले आहे.

या कामाचा दोष दायित्व निवारण कालावधी २७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. या कालावधीत रस्त्याची दुरुस्ती करून काम योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना कंत्राटदाराला वारंवार देण्यात आल्या. मात्र, संबंधित कंत्राटदाराने अद्याप दोष दूर केले नसून विभागाशी कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा उपोषणासह आत्मदहनाचा इशारा

रस्त्यावरील दोषांची दुरुस्ती अद्याप न झाल्याने गिरोली परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे मानोरा तालुकाध्यक्ष संतोष वसराम राठोड (रा. पिंप्री हनुमान, पो. गिरोली) यांनी या प्रश्नावर उपोषण करण्याचा आणि प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी

कंत्राटदाराचा असहकार आणि ग्रामस्थांचा वाढता रोष लक्षात घेऊन जि.प. बांधकाम उपविभाग, कारंजाचे उपअभियंता यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अहवाल सादर केला. पत्र क्र. १५०/२०२६ अन्वये सादर करण्यात आलेल्या या अहवालात कंत्राटदार सुमित सुनिल हरणे यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, जि.प. बांधकाम विभागांतर्गत भविष्यात संबंधित कंत्राटदाराला कामे देऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई (ब्लॅकलिस्ट) करण्याची स्पष्ट शिफारसही करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026