साटला शिवारात ग्रामीण पोलिसांची कारवाई; २० जणांवर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani gambling raid) : येथील साटला शिवारात शेतातील टिनपत्राच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या जुगार्यांवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. ९ ऑगस्टच्या सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी २० जुगार्यांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार अरविंद धबडे, जाधव, बिडगर यांचे पथक गस्तीवर असताना या पथकाला साटला शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी छापा टाकला. दोन टेबल टाकून जुगार खेळविला जात होता. मोबाईल, दुचाकी, अॅटो, कार आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी सुभाष राठोड, संजय थोरात, पांडूरंग लोखंडे, सखाराम डोंबे, दत्ता दौंड, राधेशाम घुगे, अचित सरवदे, ज्ञानेश्वर हरकळ, अर्जून बोराडे, नरहरी गरुड, प्रभाकर वावरे, अशोक सोळूंखे, संतोष काळे, अजय हटकर, आकाश चव्हाण, रमेश सानप, सुनिल गायकवाड, दिलीप वाडेगावकर, देविकांत देशमुख, जनार्धन काकडे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. गडदे करत आहेत.