पोहरादेवी सौर ऊर्जा प्रकल्प

पोहरादेवीचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच होणार कार्यान्वित!  

Pohradevi Solar Power Project: पोहरादेवीतील १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे नगारा भवन व परिसराचा वीज खर्च शून्यावर येणार, अतिरिक्त वीज विक्रीद्वारे उत्पन्न

पोहरादेवीचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच होणार कार्यान्वित!  

Pohradevi Solar Power Project

 

वीज खर्च शून्यावर आणण्याच्या दिशेने पाऊल!

मानोरा (Pohradevi Solar Power Project) : बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी उभारण्यात आलेला १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असून, या प्रकल्पामुळे नगारा भवन व परिसराचा वीज खर्च जवळपास शून्यावर येणार आहे. तसेच अतिरिक्त वीज विक्रीतून उत्पन्न मिळून विकासकामांना गती मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पाहणी दरम्यान केले.  

 जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी  मानोरा तालुक्यातील मौजे गिरोली येथे उभारण्यात आलेल्या १ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या कार्यकारी अभियंता निता बोकडे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच तहसीलदार राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत) उप-विभागाचे सहायक अभियंता स्वरूप सरोदे तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.  
 श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत या प्रकल्पासाठी २४ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार ७ कोटी रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पासाठी मौजे गिरोली येथील गट क्रमांक ३१३ मधील २ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.  

 सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग, यवतमाळ यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी पूर्ण करण्यात आली असून प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. सध्या ओपन ऍक्सेस मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य अभियंता (वाणिज्य) कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या (Pohradevi Solar Power Project) प्रकल्पातून दरवर्षी सुमारे १५ लाख किलोवॅट युनिट वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यापैकी पोहरादेवी येथील नगारा भवन व परिसरासाठी अंदाजे १२ लाख किलोवॅट युनिट वीज वापरली जाणार आहे.

उर्वरित सुमारे ३ लाख किलोवॅट युनिट वीज महावितरणला विक्री करण्यात येणार असून त्यातून मिळणारे उत्पन्न प्रकल्पाची देखभाल, व्यवस्थापन तसेच भविष्यातील विकासकामांसाठी उपयोगात आणले जाणार आहे. सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि अपारंपरिक ऊर्जा असल्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे पोहरादेवी हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र न राहता 'इको-टुरिझम' आणि 'आदर्श शाश्वत तीर्थक्षेत्र' म्हणून राज्यात नवी ओळख निर्माण करेल, असे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले.

संबंधित सामग्री

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Aug 11, 2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीएम-किसान योजना २०३१ पर्यंत सुरू; ३.१५ लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीएम-किसान योजना २०३१ पर्यंत सुरू; ३.१५ लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पीएम-किसान (PM-Kisan) योजना २०३०-३१ पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

Aug 01, 2026
मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि अभियंता योगेश आल्हाट निलंबित

मोशी दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि अभियंता योगेश आल्हाट निलंबित

मोशी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.

Jul 15, 2026
सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

तालुक्यात गुरुवारी (५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.

Jun 06, 2026
सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

Solar project tree slaughter: हिंगोलीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वन विभागाने 1200 एकर जंगलात झाडे बेकायदेशीरपणे तोडले गेले. शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आणि वन्यजीवांचा अधिवास खंडित

Jun 02, 2026