पातूर पंचायत समिती

विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप

Patur Panchayat Samiti: पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांच्यावर चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप. अनियमिततांच्या पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आली.

विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप

Patur Panchayat Samiti

 

पातूर पंचायत समितीतील प्रकार; सीईओकडे तक्रार

पातूर (Patur Panchayat Samiti) : पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांनी ग्रामपंचायत सचिवावरील चौकशी अहवाल चार महिन्यांपासून वरिष्ठांकडे सादर न करता दडपल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ८ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, पातूर पंचायत समिती अंतर्गत पिंपळखुटा ग्रामपंचायतीचे सचिव सागर रोठे आणि सरपंच अलका सुभाष वाहोकार यांच्याविरुद्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरव्यवहार, बाजार लिलावातील अनियमितता तसेच विविध बांधकामांमधील लाखोंच्या अपहाराबाबत १८ डिसेंबर २०२५ रोजी पुराव्यासह तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २० जानेवारी २०२६ रोजी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने ३० जानेवारी रोजी प्रत्यक्ष चौकशी केली.

नियमांनुसार चौकशी अहवाल १५ ते ३० दिवसांत वरिष्ठांकडे सादर करणे अपेक्षित असताना चार महिने उलटूनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशी समितीचे प्रमुख असलेले विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांनी अहवाल दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर शासकीय कामात दिरंगाई प्रतिबंधक अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ अंतर्गत कारवाई करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचीही मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

अपहाराचे पुरावे तरीही कारवाईस दिरंगाई!
ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये ई-निविदा प्रक्रिया न राबवता मनमानी पद्धतीने साहित्य खरेदी, शासकीय रॉयल्टी न भरता देयके काढणे, आठवडी बाजार लिलावातील निधी शासकीय खात्यात जमा न करता वापरणे, तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय शासकीय जागेवर अतिक्रमणधारकांच्या नावाने मालकी हक्क नोंदी करणे अशा गंभीर अनियमिततांचे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

️ प्रतिक्रिया :
“तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. जवळपास ९० टक्के अहवाल तयार झाला आहे. मात्र शासकीय कामाचा व्याप अधिक असल्याने अहवाल सादर करण्यास उशीर झाला आहे. लवकरच अहवाल सादर करण्यात येईल.”
-अनंत लव्हाळे, चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी, प. स. पातूर

संबंधित सामग्री

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाला जाग येईना..

Nandgaon Gram Panchayat Corruption: औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रेम कुमार जैस्वाल यांनी ग्रामपंचायत कार्यालय

Oct 04, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन घोटाळा प्रकरणाचा निकाल; छगन भुजबळांसह अन्य आरोपी दोषमुक्त

कलिना जमीन प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा. विशेष न्यायालयाने त्यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्त केले.

Sep 26, 2026
अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेताना अटक; ACB ची कारवाई

अभिनेता यशपाल शर्मा यांच्या भावाला ३ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून हरियाणा ACBने अटक केली. कुटुंबीयांनी मात्र रक्कम अधिकृत शुल्क असल्याचा दावा केला.

Sep 26, 2026
भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस

भाईंदरच्या तपोवन विद्यालयात मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचा आरोप. मनसेच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाची नोटीस.

Sep 23, 2026