पातूर (Patur Municipal Council) : पातूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी मंगळवारी आयोजित विशेष सभेत दोन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीत काँग्रेस-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) आघाडीच्या वतीने सय्यद नईम सय्यद यासीन, तर विकास योद्धा मंच आघाडीच्या वतीने रफिकुद्दीन सय्यद तहजीबुद्दीन सौदागर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली.
विशेष सभेत काँग्रेस-उबाठा आघाडीचे गटनेते हिदायत खान रूम खान यांनी सय्यद नईम सय्यद यासीन यांच्या नावाचा लेखी नामनिर्देश पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर केला. तसेच विकास योद्धा मंच आघाडीचे गटनेते सय्यद मुज्जमील सय्यद जमाल यांनी रफिकुद्दीन सय्यद तहजीबुद्दीन सौदागर यांच्या नावाचा नामनिर्देश सादर केला.
दोन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरल्यानंतर दोन्ही गटाचे संख्याबळा नुसार पातूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी केली.या विशेष सभेला नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांच्यासह शितल पोहरे, मोहम्मद शाकीर, आनंदा तायडे, सुनीता वाघमारे, सय्यद सद अहमद अ्जगर खान, सुफिया सदफ शै उस्मान,मो. महेताब अब्दुल रऊफ,ममता राजेश खोडे, हुसेनाबी सै अजीम, अश्विनी पाटील, तुळसाबाई गाडगे, डॉ. सय्यद वसीमोउद्दीन, बुशरा अंजुम मोहम्मद अलीमोद्दीन, शाहीजा परवीन मोहम्मद कैसर, कमरुजंम्मा खान अदिल खान मोहम्मद फैज, मोहम्मद मकसूद,सरबत जबीन सय्यद मुजाहिद इकबाल, सय्यद मुजम्मिल, सय्यद जमाल, शाहिस्ता फिरदोस, मोहम्मद इरफान आदी नगरसेवक उपस्थित होते.
पातूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी सय्यद नईम सय्यद यासीन व रफिकुद्दीन सय्यद तहजीबुद्दीन सौदागर यांची निवड
Patur Municipal Council: पातूर नगर परिसदेच्या विशेष सभेत काँग्रेस आणि विकास योद्धा मंचाच्या उमेदवारांना सदस्यपदी स्वीकृत केले गेले. नावनिर्देश पुढील दोघांना दिली गेली.
Patur Municipal Council
संबंधित सामग्री
पातुरात लोकशाहीचा उत्सव; नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आज मतदान
पातुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २० जून २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.
पातुर निवडणूक रणधुमाळी: जिल्हाधिकारी वर्षा मीना व पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा धडक आढावा
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पातूर शहरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळाले.
सदस्य पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल; सोमवारी उसळणार गर्दी
Patur Municipal Council Election: पातूर नगरपरिषदेची बहुप्रतीक्षित निवडणूक येत्या २० जून रोजी होणार असून, शहरातील राजकीय रणधुमाळीला आता जोरदार वेग आला आहे. दिनांक १८ मे पासून सदस्य आणि नगराध्यक्ष पद