कापड उद्योगातील गुंतवणुकीवर परताव्याचे अमिष कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल...!
परभणी (Parbhani Trader Fraud) : कापड उद्योगात गुंतवणुक करुन त्यावर परताव्या देण्याचे अमिष दाखवत व्हॉट्स अॅपवर ऑनलाईन लिंक पाठवून टप्प्याटप्प्याने व्यापार्याकडून ३६ लाख रुपये घेतले. त्यानंतर परतावा देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यापार्याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या (Parbhani Trader Fraud) बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीनाथ खानापूरे यांनी तक्रार दिली आहे. आरोपी व्हॉट्स अॅप क्रमांक धारक महिला रिधिमा असनानी हिच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. २९ मे ते १५ जुलै २०२६ या दरम्यान सदर महिलेने फिर्यादीच्या व्हॉट्स अॅपवर ऑनलाईन लिंक पाठविली. कापड उद्योगात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याचे सांगितले. त्यानुसार व्यापार्याने सुरुवातीला काही रक्कम टाकली. या रक्कमेवर परतावा देखील मिळाला. त्यानंतर व्यापार्याने टप्प्या टप्प्याने ३६ लाख रुपये पाठविले. काही दिवसांनी परतावा मिळणे बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यापार्याने कोतवाली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. तपास पोनि. संजय निकुंभ करत आहेत.