परभणी घरफोडी प्रकरण

परभणीतील दत्तधाम परिसरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह अडिच लाखाचा मुद्देमाल लंपास

Parbhani Burglary Case: परभणीतील दोन घटना: मरडसगावातील कम्प्युटर्स दुकानातून चाळीस हजार रोकड लंपास काढले गेले तर विश्वजिवन कॉलनीत अनोळख्या चोरांनी २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल

परभणीतील दत्तधाम परिसरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह अडिच लाखाचा मुद्देमाल लंपास

Parbhani Burglary Case

 

दुकानातून चाळीस हजाराची रोकड लंपास

परभणी (Parbhani Burglary Case) : गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव फाटा येथे असलेल्या प्रतिची कम्प्युटर्स मल्टी सर्व्हिसेस या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातून चाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना १५ जुनच्या रात्री नऊ ते १६ जुनच्या पहाटे साडे तीन या दरम्यान घडली. सीसीटिव्ही मध्ये तीन चोरटे दिसत आहेत. या प्रकरणी देवजी मारोती अळनुरे यांच्या फिर्यादीवरुन तीन अनोळखी चोरट्यांवर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

परभणी शहरातील दत्तधाम परिसरात असलेल्या विश्वजीवन कॉलनीत एका सेवानिवृत्त पोलिसाचे घरफोडत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या (Parbhani Burglary Case) प्रकरणी अनोळखी चोरट्यावर १६ जून रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

व्यंकटेश शेषेराव पवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे वडिलांचे निधन झाल्याने पत्नीसह गावी गेले होते. १२ जुनच्या पहाटे फिर्यादीच्या पुतण्याने फोन करुन शेजारांचा फोन आला होता, तुमच्या घरी चोरी झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी घरी आले. त्यांनी घराची पाहणी केली असता घरातून सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चैन, मंगळसुत्र, कानातील फुल आणि रोख रक्कम मिळून २ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. ११ जुनच्या सायंकाळी सात ते १२ जुनच्या पहाटे तीन या दरम्यान चोरी झाल्याचा अंदाज आहे. सदर प्रकरणी अनोळखी चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.