परभणी एसटी बस आग

परभणीतील मानवत बायपास रोडवर धावत्या एसटीला लागली आग

Parbhani ST Bus Fire: परभणीत मानवत बायपास रोडवर एसटी बसला आग लागली, परंतु चालक आणि वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ४३ प्रवाशांचे प्राण वाचले.

परभणीतील मानवत बायपास रोडवर धावत्या एसटीला लागली आग

Parbhani ST Bus Fire

 

चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ४३ प्रवाशांचे प्राण वाचले

परभणी (Parbhani ST Bus Fire) : मानवत शहरातील बायपास रोडवरील  संत सावता माळी चौका जवळ सोमवार ११ मे रोजी दुपारी ३ वाजता परभणीहून बिडकडे जाणार्‍या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल ४३ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. वेळेत आग विझवण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

 परभणीहून बिडकडे जाणारी  एमएच १३ सीयू ७८२८ या  क्रमांकाची एसटी बस (Parbhani ST Bus Fire) मानवत शहरातील संत सावता माळी चौकात आली असता बसच्या खालच्या भागातून धूर आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. याचवेळी मागून येणार्‍या एका ट्रक चालकाने बसला आग लागल्याची माहिती गायकवाड या बस चालकाला दिली.  त्यामुळे  समय-सूचकता दाखवत  चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालक जी. ए. गायकवाड आणि वाहक सय्यद इम्रान यांनी प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्वच्या सर्व ४३ प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.

काही क्षणांतच बसच्या खालच्या भागातून धूर वाढू लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता, मात्र चालक आणि वाहक यांनी धाडसाने आग विझवण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या (Parbhani ST Bus Fire) बसमधून मानवत, पाथरी, तेलगाव आणि बीड जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवाशांना दुसर्‍या एसटी बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026