दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातून गोरेगावकर पिता पुत्र बिनविरोध

Central Cooperative Bank: परभणी जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकात हिंगोलीचे गोरेगावकर रजेश पाटील व दिग्विजय पाटील दोघेही बिनविरोध पाहिजे. आठ पदांसाठी नॉमिनेटिंग करून सुपूर्त

दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातून गोरेगावकर पिता पुत्र बिनविरोध

Central Cooperative Bank


तेरा संचालक बिनविरोध; आठ जागांसाठी निवडणूक

हिंगोली (Central Cooperative Bank) :  दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक सन २०२६ - २०३१ साठी गुरुवार ९ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र परत घेण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी नामनिर्देशन परत घेण्यात आल्याने तेरा संचालक बिनविरोध निवडणूक आले आहेत. तर आठ संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातून राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगावकर व त्यांचे चिरंजीव दिग्विजय राजेश पाटील गोरेगावकर हे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत.

दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, इतर शेती संस्था, महिला प्रतिनिधी, अनु.जाती., अनु. जमाती, वि.ज.भ.ज., वि.मा.प्र., इतर मागास प्रवर्गातून संचालक निवडूण द्यावयाचे आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर गुरुवारी नामनिर्देशन परत घेण्यात आले. निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वच राजकीय मंडळींनी जोर लावला. अपेक्षेप्रमाणे अर्ज मागे घेण्यात आल्याने तेरा संचालक बिनविरोध निवडूण आले आहेत.

यामध्ये परभणी तालुक्यातून प्राथमिक कृषी पत पुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघातून माजी आ. सुरेश अंबादासराव वरपूडकर, पालम तालुक्यातून तुषार काशीनाथराव दुधाटे, गंगाखेड तालुक्यातून आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, पाथरी तालुक्यातील पठाण मेहराज खान शेरगुलखान, जिंतूर तालुक्यातून माजी आ. रामप्रसाद वामनराव बोर्डीकर, सेलू तालुक्यातून आ. मेघना बोर्डीकर, सोनपेठ तालुक्यातून आ. राजेश उत्तमराव विटेकर, औंढा तालुक्यातून राजेश साहेबराव पाटील, सेनगाव तालुक्यातून दिग्विजय राजेश पाटील हे संचालक बिनविरोध निवडूण आले आहेत. कृषी पणन संस्था व शेत माल प्रक्रिया मतदार संघातून माजी आ. सुरेशराव सखाबापू देशमुख, महिला प्रतिनिधी मतदार संघातून प्रेरणा समशेर वरपूडकर, भावना बोर्डीकर, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून भगवान नारायणराव वाघमारे बिनविरोध निवडूण आले आहेत. कळमनुरी, हिंगोली, वसमत, पूर्णा, मानवत या ठिकाणी निवडणूक होणार आहे. पाच ठिकाणी मतदान होणार असून आठ संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार १० जुलै रोजी निवडणुकीसाठी चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. 

या ठिकाणी होणार लढत
पूर्णा तालुक्यातून प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघात नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे, तुळशीराम यशवंतराव बोबडे, मानवत तालुक्यात अमोल गंगाधरराव कदम, आकाश पंडितराव चोखट, हिंगोली तालुक्यात राजामती शिवाजी मुटकुळे, रमेश विठ्ठलराव शिंदे, गुलाबराव रामजी सरकटे, वसमत तालुक्यात आ.चंद्रकांत रमाकांतराव नवघरे, तुषार जाधव, कळमनुरी तालुक्यात अभय अरुणराव सावंत, बालासाहेब उत्तमराव मगर, दत्तराव बापूराव कदम यांचे अर्ज आहेत. इतर शेती संस्थेत विजयकुमार आनंदराव मोरे, विजय रावसाहेब जामकर, आ. खान सईद शेरगुल खान, सय्यद हरसान हुसैनी सय्यद नोमान, प्रिती सचिन जाधव, अनु.जाती, अनु. जमाती मतदार संघात प्रशास चंद्रशेखर ठाकूर, अतूल गोपीनाथराव सरोदे, संजय ज्ञानोबा सारणीकर, तुकाराम धोंडिबा रुमाले, शोभा हनुमंतराव बोबडे, यशवंतराव चंपतराव वाटोडे यांचे अर्ज आहेत. वि.ज.भ.ज. वि.मा. प्र. मतदार संघात सुनंदा अशोकराव फलके, दत्तात्रय रामभाऊ मायंदळे, बळीराम रामचंद्र सोरेकर यांचे अर्ज आहेत. या मतदार संघात निवडणूक होणार आहे.

हे संचालक बिनविरोध
दि  परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकीत माजी. आ. सुरेश अंबादासराव वरपूडकर, तुषार काशीनाथराव दुधाटे, आ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, पठाण मेहराज खान शेरगुल खान, माजी आ. रामप्रसाद वामनराव बोर्डीकर, आ. मेघना बोर्डीकर, आ. राजेश उत्तमराव विटेकर, राजेश साहेबराव पाटील, दिग्विजय राजेश पाटील, माजी आ. सुरेशराव सखाबापू देशमुख, प्रेरणा समशेर वरपूडकर, भावना बोर्डीकर, भगवान नारायणराव वाघमारे हे बिनविरोध निवडूण आले आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026