हिंगोली उर्ध्व पैनगंगा प्रकल्प

हिंगोली येथे अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ कार्यालय कार्यरत; सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार

Hingoli Upper Panganga Project: हिंगोली येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळचे कार्यालय नांदेडपासून स्थलांतरित झाले. यामुळे सिंचन प्रकल्पांना गती मिळणार आणि शेतकऱ्यांना प्रशासनाशी सुलभ समन्वय मिळणार

हिंगोली येथे अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ कार्यालय कार्यरत; सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार

Hingoli Upper Panganga Project

हिंगोली (Hingoli Upper Panganga Project) : जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचे कामकाज गतिमान, लोकाभिमुख व कार्यसुसंगत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी दि. 27 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय हिंगोली (Hingoli Upper Panganga Project) येथे स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय दि. 01 जून 2026 पासून हिंगोली येथील जुनी पोदार शाळा परिसरात कार्यरत करण्यात आले आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता, मंडळांतर्गत सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे कार्यालय हिंगोली येथे कार्यरत झाल्यामुळे जिल्ह्यातील तसेच परिसरातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना अधिक गती मिळणार आहे.

तसेच सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण अधिक प्रभावीपणे व तातडीने होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व लाभधारकांना प्रशासनाशी समन्वय साधणे सुलभ होणार असून जलसंपदा विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतही यामुळे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. (Hingoli Upper Panganga Project) उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे कार्यालय हिंगोली येथे सुरू झाल्याने सिंचन विकासाला चालना मिळून परिसरातील कृषी क्षेत्राच्या विकासासही मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026