एनसीएमसी कार्ड

एनसीएमसी कार्ड सक्तीची नाही, जुन्या ओळखपत्रांवर सवलत सुरूच

NCMC Card: हिंगोली आगार प्रमुख किशोर महाजन यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड सक्तीचे नाहीत व जुन्या ओळखपत्रांवर सवलत सुरूच राहिल.

एनसीएमसी कार्ड सक्तीची नाही, जुन्या ओळखपत्रांवर सवलत सुरूच

NCMC Card

हिंगोलीचे आगार प्रमुख किशोर महाजन यांची माहिती

हिंगोली (NCMC Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा तर्फे सवलतधारी व विना सवलतधारी प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी सध्या या कार्डाची प्रवासासाठी सक्ती करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण हिंगोली आगार प्रशासनाने दिले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र हे कार्ड सक्तीचे होणार असल्याच्या अनधिकृत बातम्या प्रसार माध्यमांवर येत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या (NCMC Card) पार्श्वभूमीवर रा. प. हिंगोली आगाराने वस्तुस्थिती स्पष्ट केली. आगार प्रशासनाने कळविले की, सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी अधिकृत ओळखपत्रे सवलतीसाठी वैध धरण्यात येत आहेत. एनसीएमसी कार्ड नसल्यास प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही व सवलत नाकारली जाणार नाही. एनसीएमसी कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू असून ८० टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच कार्डबाबत अधिकृत घोषणा महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. 

तत्पूर्वी कोणतीही सक्ती लागू होणार नसल्याचे आगाराने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता जवळचे अधिकृत (NCMC Card) ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात रा. प. बसने प्रवास करावा, असे आवाहन हिंगोली आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांनी केले आहे. एनसीएमसी कार्डबाबत भविष्यातील निर्णय महामंडळाच्या अधिकृत परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026