मानोरा (Nayara Petrol Pump) : मानोरा शहरापासून २ किलो मीटर अंतरावर असलेल्या नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची एकच गर्दी होत असुन पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची झुंबड दिसून येत आहे. सविस्तर असे की, शहरातील इतर पंपावर इथेनॉल मिश्रित ( ई २० ) पेट्रोल मोटर सायकल आणि चार चाकी वाहन टाकले तर रस्त्यावर धावताना वाहन हेलकावे मारत असल्याचा प्रत्यय वाहन चालकांना येत आहे. या समस्यामुळे अनेक वाहने बंद पडत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी चालक (Nayara Petrol Pump) नायरा पंप गाठून पेट्रोल भरणा करत आहे.
मानोरा-दिग्रस रोडवर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर एकच (Nayara Petrol Pump) नायरा कंपनीचा पेट्रोल पंप असुन इथेनॉल मिश्रित ( ई २० ) पेट्रोलच्या वाहनाला येणाऱ्या समस्यामुळे नायरा पंपाला पसंती देत वाहनधारक नायरा पंपावर वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे.
वाहनधारकाची पेट्रोल टाकण्यासाठी एकच गर्दी पंपावर वाढत असल्याने नायरा कंपनीकडे पेट्रोल पुरवठा करण्याकरता टँकर वाढविण्याची मागणी केली आहे.
-माधव सरोदे, संचालक नायरा पेट्रोल पंप, बेलोरा
नायरा पेट्रोल पंप
शुद्ध पेट्रोलच्या शोधात वाहनचालक; नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी!
Nayara Petrol Pump: E20 समस्यामुळे अनेक वाहने बंद पडत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी चालक नायरा पंप गाठून पेट्रोल भरणा करत आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Nayara Petrol Pump