ध्वज संहितेचे पालन करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
रिसोड (Har Ghar Tiranga-2026) : “हर घर तिरंगा – २०२६ “ मोहीमे अंतर्गत रिसोड नगर परिषद रिसोड वतीने शहरातील मुख्य भागात दिनांक १२/०८/२०२६ रोजी तिरंगा मोटारसायकल/बाईक रैलीचे आयोजन करणायत आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र शासनाकडून सन २०२२ पासुन “हर घर तिरंगा” हि मोहीम सुरु करण्यात आली आहे त्यानुषंगाने सन २०२६ मध्ये “हर घर तिरंगा-२०२६” मोहीम केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दि.०९ ऑगष्ट ते १७ ऑगष्ट २०२६ या कालावधीमध्ये राबविण्याचे नियोजन राज्य शासनामार्फत करण्यात आलेले आहे.त्यानुषंगाने सदर मोहिमे अंतर्गत रिसोड शहरात प्रशासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत सदर उपक्रमाची जाणीव जागृती नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून शहरातील शासकीय,निमशासकीय,खाजगी अस्थापना व तसेच प्रत्येक घरी व इमारतीवर दिनांक १३ ते १५ ऑगष्ट २०२६ रोजी केद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता २००२ भाग -१ मधील परीच्शेद १.२ नुसार असावे.
भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी,”घरोघरी तिरंगा” या (Har Ghar Tiranga-2026) उपक्रमाची सेल्फिज,छ्याचित्रे ,ध्वनिफीत चित्रफित ध्वनिमुद्रण इत्यादी केंद्र शासनाच्या संसाकृतिक मंत्रालयाच्या harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत. असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून रिसोड शहरात नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नगर परिषद रिसोडच्या प्रांगणातून पालखी मार्गे-लोणी फाटा-वाशीम नाका-सिविल लाईन मार्गे नगर परिषद पर्यंत मोटारसायकल/बाईक रैलीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर उपक्रमादरम्यान देशभक्तीपर गीते व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अध्यक्ष भगवान सीताराम क्षीरसागर उपाध्यक्ष विष्णू कदम व सर्व सन्माननीय नगरसेवक यांचे सहकार्याने मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या नेतृत्वात राजेंद्र पट्टेबहादूर-सहायक प्रकल्प अधिकारी,रोहित बढेल-आरोग्य निरीक्षक,सुनील मगर-अधीक्षक, शिवानंद बरडे-मिळकत व्यवस्थापक,नंदकिशोर डाखोरे-पाणीपुरवठा अभियंता,प्रकाश गणेशपुरे-विद्युत अभियंता इत्यादी सर्व कर्मचारी अधिकारी यांनी पार पाडला.