अनुसूचित जाती आरक्षण

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण थांबवण्याची मागणी

SC Reservation: नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात धरणे आंदोलन सुरू. आंदोलकांनी निवडक आकडेवारीशिवाय उपवर्गीकरण स्थगित करण्याची मागणी केली.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण थांबवण्याची मागणी

SC Reservation

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड (SC Reservation) : राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र ही प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा आरोप करत मंगळवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन (SC Reservation) करण्यात आले आहे.यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.जोपर्यंत नवीन जनगणना पूर्ण होत नाही आणि न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला जात नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

​आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात न्यायमूर्ती (निवृत्त) अनंत बदर यांची समिती गठीत करण्यात आली होती. या (SC Reservation) समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे, मात्र तो अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. अहवाल समोर न आणता हरकती मागवणे ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या २०२४ च्या निकालानुसार, उपवर्गीकरणासाठी प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित आकडेवारी असणे अनिवार्य आहे. कोणताही शास्त्रीय डेटा संकलित न करता ही प्रक्रिया राबवणे घटनाबाह्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.सध्या देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे.

जोपर्यंत अधिकृत जनगणना पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपवर्गीकरणाची कोणतीही कार्यवाही करू नये, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास, येत्या २७ एप्रिल रोजी सर्व ५९ जाती संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या धरणे आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील ५९ जातींचे प्रतिनिधी, आंबेडकरी अनुयायी आणि संविधान जागृत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026