​'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या पक्षांचा निषेध

'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.

​'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या पक्षांचा निषेध

Nanded Protest

​नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचे 'जनआक्रोश आंदोलन'

​नांदेड (Nanded Protest) : 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी शहरातील आयटीआय चौक परिसरात निदर्शने करण्यात आली. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा युवा मोर्चाने हे 'जनआक्रोश आंदोलन' केले.

​'नारीशक्ती वंदन अधिनियम' विधेयक भाजपाने लोकसभेत मांडले होते. या कायद्यामुळे महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून आपली महिलाविरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महानगरच्या वतीने आयटीआय चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. हे विधेयक संसदेत पारित व्हावे आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या समर्थनातील या विधेयकाला पाठिंबा द्यावा, अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी दिला आहे.


​
या आंदोलनात भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. ज्योतीताई कल्याणकर, नगरसेविका सुप्रियाताई संजय पाटील रातोळीकर, कविता गड्डम, मंजूशा राणवळकर, ज्योत्स्ना लांडगे, सुषमा थोरात, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले,उमेश चव्हाण,विजय येवणकर, विजय गंभीरे,शीतल खांडील,सुमित मुथा, करणसिंग खालसा, मनोज भंडारी, आशिष नेरलकर,  बालाजी शेलगावकर, ओम बंडेवार, करण चव्हाण, शिवा लोट, प्रियेश ठाकूर, शिवकुमार बैनवाड, पवन इंगोले, राहुल देशमुख, प्रेम विर, अक्षय पवार, विशाल गिरी, अर्जुन कोकाटे, सचिन नरंगले, विशाल संपतावर, शुभम खोडके, बालाजी बोकारे, निखिल पुरी,अध्ययन तेहरा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित सामग्री

40 नगरसेवक पर्यटनावर, चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय वादळ ; विधान परिषद निवडणुकीआधीच वातावरण तापलं

40 नगरसेवक पर्यटनावर, चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय वादळ ; विधान परिषद निवडणुकीआधीच वातावरण तापलं

पूर्व विदर्भातील चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

May 25, 2026
महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा 'राजकीय डाव' फसला ; ॲड. गंगासागर पेदेवाड यांची टीका

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा 'राजकीय डाव' फसला ; ॲड. गंगासागर पेदेवाड यांची टीका

​२०२३ मध्ये 'नारीशक्ती वंदन' अभियानांतर्गत महिला आरक्षण विधेयक ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात संमत झाले होते.

Apr 23, 2026
फडणवीसांच्या आव्हानावर सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल; खुल्या चर्चेसाठी अंधारे तयार - “वेळ-ठिकाण तुम्ही ठरवा”

फडणवीसांच्या आव्हानावर सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल; खुल्या चर्चेसाठी अंधारे तयार - “वेळ-ठिकाण तुम्ही ठरवा”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीकेची झोड उठवत खुल्या चर्चेचे आव्हान दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे.

Apr 21, 2026
‘नारीशक्ती वंदन’वरून राजकारण तापलं; मोदींचा विरोधकांना इशारा

‘नारीशक्ती वंदन’वरून राजकारण तापलं; मोदींचा विरोधकांना इशारा

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील 131वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली.

Apr 18, 2026
हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे 'थाळी बजाओ' आंदोलन; काँग्रेसचा जाहीर निषेध

हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे 'थाळी बजाओ' आंदोलन; काँग्रेसचा जाहीर निषेध

आंदोलनाचे नेतृत्व पूर्णपणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.

Apr 18, 2026