हिंगोली (Aundha Nagnath gutkha seized) : औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
अवैध व्यवसायाला पाबंद घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशावरून हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सुचनेवरून छापे मारले जात आहेत. २० ऑगस्टरोजी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनखळी गावात माणिक यशवंतराव गारकर यांच्या घरामध्ये अवैध गुटख्याचा साठा साठवणुक केल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांच्यासह राजकुमार कुटे, शेळके यांच्या पथकाला छापा मारण्यास रवाना केले. यामध्ये पथकाने १ लाख ४२ हजार ७८० रुपयाचा गुटखा जप्त केला. औंढा ना. पोलिसात माणिक यशवंतराव गारकर, संजय बाळासाहेब गारकर या दोघावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
औंधा नागनाथ गुटखा जप्त
औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त
Aundha Nagnath gutkha seized: औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Aundha Nagnath gutkha seized
टैग्स:
Aundha Nagnath gutkha seized
illegal religious funds
police raid nanded
unauthorized deposits
Nanded police arrest
ankhaliy gang money
संबंधित सामग्री
नांदेडच्या गोदावरी पात्रात वाळू माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई
Nanded sand mafia: नांदेड पोलिसांनी 'ऑपरेशन कॅकडाउन' या नावाखाली गोदावरी नदी पात्रावर वाळू उपसा करणारे माफिया १६ जणांचा शोध घेतला, तसेच त्यांच्या ३ कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला.
Jun 17, 2026