भरधाव बसखाली दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू

शहरात बेदरकार वाहनचालकांचा आणखी एक बळी गेला आहे.

भरधाव बसखाली दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू

Nagpur Reckless Driving

नागपूर (Nagpur Reckless Driving) : शहरात बेदरकार वाहनचालकांचा आणखी एक बळी गेला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव बस चालकाने दुचाकीला धडक दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सीताबर्डी परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या या भीषण अपघाताने नागरिक हादरले. मंगळवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेट्रो पिल्लर क्र. २१५ जवळ हा अपघात घडला. रितेश पुंडलिक सातपुते (वय ४५, रा. प्रेमनगर, झेंडा चौक) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश सातपुते हे मेडिसिन डिलिव्हरीचे काम करीत होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे एमएच-३१/सीटी-२१२३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कामावर निघाले होते. दुपारी संविधान चौकातून झिरो माईलकडे जात असताना, ई-बस चालक शेख सरवर शेख सगीर (वय २६, रा. वाठोडा) याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रिंस सावजी भोजनालयाजवळ त्यांच्या दुचाकीला बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत रितेश वाहनासह खाली पडले आणि त्याच वेळी बसचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत रितेश यांच्या पश्चात पत्नी मयुरी, मुलगा शिवांश (८) आणि मुलगी सृष्टी (१२) असा परिवार आहे. या प्रकरणी मृताचे भाऊ श्याम सातपुते यांच्या तक्रारीवरून आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वेग आणि बेफिकीरी ठरतेय घातक

शहरात वाढत्या वेगवान आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ओव्हरटेक करण्याच्या घाईत नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक नियमांचे पालन, वेगावर नियंत्रण आणि सतर्कता हीच अपघात टाळण्याची किल्ली असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पोलिसांनीही अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कारवाईची गरज व्यक्त केली आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वाहन चालवणे अत्यावश्यक आहे.

संबंधित सामग्री

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

Papa Jadhav murder: राजुरा न्यायालयासमोर प्रदीप बारजवळ सोमवारी सायंकाळी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी सोमनाथपूर वॉर्डातील विनोद उर्फ ‘पापा’ जाधव यांच्यावर गोळीबार

Aug 24, 2026
‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

Patur Road Pothole: या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासकीय यंत्रणा तातडीने हरकतीत आली असून, रविवारी/सोमवारी जेसीबी, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन खड्ड्यामध्ये मुरूम व खडी.

Jul 28, 2026
स्ट्रीट लाईट सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

स्ट्रीट लाईट सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Street Light Andolan: पुनीसतील सिटी काउन्सिलने स्ट्रिट लाईट पुन्हा सुरू केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी तातडीने दखल घेण्याचा आंदोलन शुरू केला आहे.

Jun 15, 2026
खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

खेळता खेळता पाण्याच्या डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

शहरातील बोधे नगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, खेळत असताना पाण्याच्या डबक्यात पडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

May 18, 2026
परभणीत दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी; मरडसगाव पाटीवरील घटना

परभणीत दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी; मरडसगाव पाटीवरील घटना

गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटीजवळ दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना रविवार (१६ मे) रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली.

May 17, 2026