MSEDCL

हिंगोली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासह तीन अधिकारी निलंबित

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी दि. 30 जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

हिंगोली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासह तीन अधिकारी निलंबित

MSEDCL

50 लाखांचे काम अपूर्ण असतानाच कंत्राटदाराला देयक अदा केल्याचा ठपका

हिंगोली : जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे महावितरणच्या 11 के.व्ही. फिडरचे काम पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला देयकाची रक्कम अदा केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता राजेशसिंग माधवसिंग चव्हाण, सहाय्यक अभियंता सचिन बेलसरे आणि रणजित देशमुख या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी दि. 30 जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार, अधीक्षक अभियंता चव्हाण व इतर दोघांनी निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नर्सी नामदेव व घोटा या वाहिन्यांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी सहा किलोमीटर लांबीची उच्चदाब वाहिनी तसेच नर्सी उपकेंद्र येथे 11 के.व्ही. फिडर बसविण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या 2025-26 अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. हे काम मे. ए.आर. इलेक्ट्रिकल्स अ‍ॅन्ड इंजिनिअर्स या कंत्राटदारास दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आले होते.

कंत्राटदाराने दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी 50 लाख 37 हजार 638 रुपयांचे बिल सादर केले. हे काम पूर्ण झाल्याचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी प्रमाणित केले होते. मात्र, मंजूर अंदाजपत्रक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या शासकीय मान्यतेनुसार काम पूर्ण झाले नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

काम पूर्ण न करताच बिल अदा झाल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीचा अंतिम अहवाल वरिष्ठांकडे सादर झाल्यानंतर महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण, सहाय्यक अभियंता सचिन बेलसरे आणि रणजित देशमुख या तिघांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले.

मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले धनंजय औंढेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा विभागातील महावितरणच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे. कर्तव्यदक्ष आणि कठोर अधिकारी म्हणून परिचित असलेल्या औंढेकर यांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे मराठवाड्यातील महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पहिलीच मोठी कारवाई

महावितरणमध्ये अधीक्षक अभियंत्यासारख्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यावर निधीच्या गैरवापराच्या आरोपावरून चौकशी करून प्रादेशिक कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. या कारवाईत अधीक्षक अभियंत्यासह अन्य दोन वरिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. काम अपूर्ण असताना बिल उचलणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026