आमदार कार्य गौरव आढावा पुस्तिका

शिक्षकांच्या मनात प्रेम, आपुलकी व विश्वास निर्माण केल्यामुळेच किरणराव सरनाईक शिक्षकांचे आमदार

MLA Performance Review Booklet: शिक्षकांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास निर्माण करण्यात शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच शिक्षकांनी त्यांना आपला प्रतिनिधी

शिक्षकांच्या मनात प्रेम, आपुलकी व विश्वास निर्माण केल्यामुळेच किरणराव सरनाईक शिक्षकांचे आमदार

MLA Performance Review Booklet

 

बाबारावजी खडसे पाटील यांचे गौरवोद्गार! आमदार कार्य गौरव आढावा पुस्तिकेचे विमोचन

रिसोड (MLA Performance Review Booklet) : शिक्षकांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास निर्माण करण्यात शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच शिक्षकांनी त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून आमदारपदाची जबाबदारी सोपविली, असे गौरवोद्गार बाबारावजी खडसे पाटील यांनी काढले. शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित ‘आमदार कार्य गौरव आढावा पुस्तिका’ (MLA Performance Review Booklet) विमोचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी बाबारावजी खडसे पाटील यांनी ॲड. किरणराव सरनाईक यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती आणि शिक्षकांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे किरणराव यांनी शिक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

‘आमदार कार्य गौरव आढावा पुस्तिका’ (MLA Performance Review Booklet) ही त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारी असून, शिक्षकांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांची आणि कार्याची माहिती या पुस्तिकेतून समोर येते. त्यांच्या कार्याला शिक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी पावती असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी मंचावर शिक्षक आमदार किरणराव सरनाईक,श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे सचिव भिकाजीराव नागरे, श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम कोषाध्यक्ष प्रदीपराव देशमुख, देविदासराव नागरे,पंजाबराव देशमुख, जितेंद्र कुमार दलाल, संजय जिरवणकर, डॉ.गोपीकिशन  सिकची, डॉ.गरकळ, डॉ.रामेश्वर नरवाडे, मोहम्मद कबीर मोहसीन, अमित पाटील खडसे, भास्करराव सोनुने,प्राचार्य जानराव देशमुख हे उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी गेल्या साडेपाच वर्षांमध्ये मी शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांसाठी जे जे करणे श्यक होते ते सर्व कामे केल्याची व यापुढेही करत राहण्याचे आश्वासन दिले, माझी आमदार म्हणून कार्य गौरव पुस्तिका हेच मी शिक्षकांसाठी केलेल्या कामाचे प्रमाण असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमास तालुक्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच ॲड. किरणराव सरनाईक यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ॲड. किरणराव सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या भावी सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विजय देशमुख यांनी केले.