परभणी पोलीस निलंबीत 

परभणीतील पिंपळदरीतील तिघे तर बोरीतील एक पोलीस अंमलदार निलंबीत 

Parbhani police suspended: पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यातील तिन आणि बोरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला निलंबीत केले आहे.

परभणीतील पिंपळदरीतील तिघे तर बोरीतील एक पोलीस अंमलदार निलंबीत 

Parbhani police suspended

 

कर्तव्यातील निष्काळजीपना भोवला परभणी पोलीस अधिक्षक यांचे आदेश 

परभणी (Parbhani police suspended) : कर्तव्यातील निष्काळजीपना पोलीस अंमलदारांना चांगलाच महागात पडला आहे. पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यातील तिन आणि बोरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला निलंबीत केले आहे. याबाबत बुधवार १२ ऑगस्ट रोजी आदेश काढण्यात आले आहेत.  पिंपळदरी पोलीस ठाण्यातील पोह मुंजा पायघन, पोशि मुंजाजी पवार, गजानन फुगनर यांना निलंबीत करण्यात आले आहे.

संबधीत कर्मचार्‍यांनी गोवंश वाहतुकीच्या वाहनावर कारवाई करत असतांना एक वाहन सुटले होते. कारवाई दरम्यान कामात कसुर केल्याने संबधीत अंमलदारांना निलंबीत करण्यात आले आहे. तर बोरी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल लाड यांनी गोपनिय सुत्रांची माहिती उघड केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर अंमलदार काही महिण्यांपूर्वी निलंबनातून हजर होऊन बोरी पोलीस ठाण्यात रुजु झाला होता. पुन्हा या अंमलदारावर निलंबनाची कारवाई झाली आहे.