मानोरा चोरी घटना

मानोरा शहरात चोरी आणि अपघाताच्या घटनांमध्ये वाढ!

Manora Theft Incident: मानोरा शहरात अलिकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून मुख्य मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण

मानोरा शहरात चोरी आणि अपघाताच्या घटनांमध्ये वाढ!

Manora Theft Incident

 

शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी! 

मानोरा (Manora Theft Incident) : मानोरा शहरात अलिकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून मुख्य मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत कृषिमंत्री तथा पालकमंत्री यांना दि. ७ सप्टेंबर शुभम छालिवाल आणि अनिल चांडक यांनी पाठविले आहे. 

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ (NH-161) हा सर्वात वर्दळीचा मार्ग असून, दिग्रस चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार समिती हे गावातील प्रमुख व संवेदनशील ठिकाणे आहेत. तसेच वाढत्या मोबाईल चोरीच्या घटना आठवडी बाजारात होत आहेत. या (Manora Theft Incident) सर्वांचा आळा घालण्याच्या दृष्टीने उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी. यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास, अपघातांचा तपास करण्यास तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल.

यासाठी पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी महत्वाच्या बाबीकडे गांभीर्याने व प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही व निधीची तरतूद करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार मार्फत पाठविले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी माननीय ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जिल्हाधिकारी यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

टैग्स: Manora Theft Incident