दोन युवकांना पाइपने मारहाण व शिवीगाळ; पोलीस निरीक्षक याजकडे तक्रार!
मानोरा (Manora Police Station) : कावड यात्रेच्या दिवशी पान खाण्यासाठी गेलेल्या दोन मागासवर्गीय युवकांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप मानोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलीस शिपायांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितांनी ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार वसंतनगर मानोरा येथील नितीन धनंजय लोखंडे (३५, जात आंध) व विशाल अरुण गायकवाड (३०, जात महार) दोघांनी देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे.
मानोरा पोलीस स्टेशन (Manora Police Station) येथे कार्यरत पोलीस शिपाई शेख फिरोज (ब.नं. ७२५) व श्रावण राठोड (ब.नं. ११०५) या दोघांनी दिन. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मानोरा शहरात कावड यात्रेचा कार्यक्रम होता. त्यावेळी आम्ही दिवाण चौकातील चिंतामणी पान पॅलेस येथे पान खाण्यासाठी गेलो असता, स्टेट बँक मानोराजवळ पोलीस पेट्रोलिंग गाडी आली व आम्हाला नाव गाव विचारून आमचे फोटो काढले. व गाडी तेथून निघून गेली.
आमचे फोटो काढल्यामुळे आम्ही घाबरलो व घरी जाता वेळेस ११२ वर कॉल करून आम्ही काहीही केले नसताना फोटो का काढले अशी विचारणा केली. त्यानंतर आम्ही वसंतराव नाईक विद्यालयाजवळ पोहोचलो असता लगेच पोलीस गाडी आली व त्यांनी आमचे फोटो काढलेल्या गाडीला परत बोलावून आम्हाला नाव, गाव, जात विचारून "आंधळे हो, महारडे हो, तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्ही लय माजले, बाबासाहेबांमुळे तुम्ही लय माजले" अशी जातीवाचक शिवीगाळ करून पाईपने व थापडाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
मारहाणीमुळे पुढचे दिसेनासे झाले, झोपता येत नाही. अर्जदार विशाल गायकवाड च्या पायाचा मार उजव्या मार वाकवण्यासाठी उजवा हात मध्यात घातला असता करंगळी, अंगठा व करंगळीच्या बाजूच्या बोटाला खूप मार लागून करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. दोघांचे मेडिकल ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे केले आहे. आमचा काहीही दोष नसताना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यावेळी दोन्ही पोलीस सिव्हिल ड्रेसवर होते व दारू प्यायलेले होते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या (Manora Police Station) प्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या तक्रारीची प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा लाड यांना पाठविण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.