मानोरा शहर गणेशोत्सव

मानोरा शहरात प्रशासनाकडून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

Manora City Ganeshotsav: मानोरा शहरात गणेशोत्सवाला सुरुवात होऊन  बाप्पाच्या आगमनाला ५ दिवस पूर्ण झाले असतानाही शासन तथा नगर पंचायत प्रशासन शहरवासीयांच्या आस्थेशी खिलवाड करत असल्याचा आरोप

मानोरा शहरात प्रशासनाकडून भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

Manora City Ganeshotsav


चिंतामणी गणेश मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य
बाप्पाच्या आगमनाला ५ दिवस उलटूनही स्वच्छता नाही;
विसर्जन घाटाचीही दुरवस्था, भाविकांमध्ये संताप

मानोरा (Manora City Ganeshotsav) : मानोरा शहरात गणेशोत्सवाला सुरुवात होऊन  बाप्पाच्या आगमनाला ५ दिवस पूर्ण झाले असतानाही शासन तथा नगर पंचायत प्रशासन शहरवासीयांच्या आस्थेशी खिलवाड करत असल्याचा आरोप गणेश भक्तांकडून होत आहे.

शहराचे श्रद्धास्थान मानले जाणारे चिंतामणी गणेश मंदिर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा पसरलेला आहे. या घाणीमुळे गणेश भक्त मंदिरात दर्शनासाठी येण्यासही तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश स्थापना होऊन ५ दिवस उलटले तरी ना गणेश मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे, ना गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आली आहे.  गणेश भक्तांची मागणी आहे की, जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गणेश मंदिर परिसर तथा गणेश विसर्जन घाटाची तात्काळ स्वच्छता करून गणेश भक्तांच्या आस्थेप्रती जागरूकता दाखवावी, अशा प्रतिक्रिया शहरवासी तथा गणेश भक्तांकडून व्यक्त होत आहेत.

टैग्स: Manora City Ganeshotsav