माहुर आमरण उपोषण

आता आश्वासन नको कृती करा; तरच उपोषणाची माघार

Mahur Amaran Uposhan: (नांदेड) धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग(क्र. १६१अ) शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सन २०१९ पासून सुरू आहे. मात्र अद्याप या मार्गाचे कामे पूर्ण झाली नसल्याने ती कामे तातडीने

आता आश्वासन नको कृती करा; तरच उपोषणाची माघार

Mahur Amaran Uposhan

 

उपोषण कर्त्यांची मागणी

माहुर (Mahur Amaran Uposhan) : (नांदेड) धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग(क्र. १६१अ) शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम सन २०१९ पासून सुरू आहे. मात्र अद्याप या मार्गाचे कामे पूर्ण झाली नसल्याने ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी या करीता दि.२८ रोजी पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असुन, आता आश्वासन नको कृती करा तरच उपोषणाची माघार असा पवित्रा देखील उपोषणकर्ते यांनी घेतला आहे. 

तिर्थक्षेत्र असलेल्या माहुरगड शहराच्या मध्यभागातून जाणार्‍या  राष्ट्रीय महामार्गाचे विविध कामे आजगत अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिक, भाविक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असुन न्यायालय ते ग्रामीण रुग्णालय या मार्गावरील दुभाजकातील पथदिवे बंद असल्यामुळे शहरात रात्रीला काळोख पसरला आहे दत्त चौक (टी-पॉईंट) ते ग्रामीण रुग्णालय या मार्गाच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाचे सुशोभीकरण तसेच रखडले आहे. याशिवाय संरक्षक जाळी ही बसविण्यात आली नसल्याने नागरीकांना जिव गमवावा लागला आहे.

या सह धनोडा येथील पैनगंगा नदीवरी नवीन पूल आज पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने प्रवाशी व भाविकांना जिर्ण व खड्याचे साम्राज्य पसरलेल्या जुन्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला मालवाडा घाटातील देखील रस्त्याचे काम रखडले असल्याने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान, अनसूया माता मंदिर, कैलास टेकडी, बाबा सोनापीर दर्गा, शेख फरीद धबधबा, पांडव लेणी, रामगड किल्ला आणि मातृतीर्थ यांसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे  प्रसिद्ध आहे.दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येथे येत असल्याने नवरात्र महोत्सवापूर्वी ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत या मागणीकरीता (Mahur Amaran Uposhan) उपोषण कर्ते राज ठाकुर व अपिल बेलखोडे आमरण उपोषणाला सुरुवात केली.

खा. नागेश पाटील आष्टीकर हे विरोधी बाकावरूण विकासाच्या मुद्यावर सत्तेत सहभागी झाले तर खा.पाटील यांचे माहूरच्या दत्तशिखर संस्थानाशी जिव्हाळ्याचे संबंध तसेच दत्तभक्त म्हणून परिचित आहेत.(१६१ अ) या राष्ट्रीय महामार्गाचे काम गत ५ वर्षापासून रखडल्याने ते काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी दि २८ पासुन दत चौक टी-पॉईंट येथे आमरण उपोषणास सुरू करण्यात आले या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून खा. पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून उपोषणकर्ते व माहूर शहरवासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टैग्स: Mahur Amaran Uposhan