महावितरण अभियंता फसवणूक

महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याची 10 लाख रुपयाने फसवणुक; गुन्हा दाखल

Mahavitaran Engineer Fraud: हिंगोलीत महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या खात्यातून 10 लाख रुपये सायबर भामट्यांनी उडवले. महानगर गॅस पाईपलाईनचे थकीत पैसे भरण्याचे कारण देऊन फसवणूक केली.

महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याची 10 लाख रुपयाने फसवणुक; गुन्हा दाखल

Mahavitaran Engineer Fraud

गॅस पाईप लाईनेच पैसे थकीत असल्याचा संदेश देणारी ईपीके फाईल उघडल्याने घडला फसवणुकीचा प्रकार

हिंगोली (Mahavitaran Engineer Fraud) : महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या मोबाईलवर तुमच्या घराचे महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असल्याने कनेक्शन बंद करीत असल्याचे सायबर भामट्याने सांगुन ईपीके फाईल पाठविण्यात आली होती. चव्हाण यांनी ही ई पीके फाईल उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील १० लाख रुपये सायबर भामट्याने काढून घेतल्याने हिंगोली शहर पोलिसात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, (Mahavitaran Engineer Fraud) महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग माधवसिंग चव्हाण यांचे मुंबई येथे घर असुन ५ एप्रिल रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून आपले नाव दिपक जोशी असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या घराचे महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असल्याने तुमचे कनेक्शन बंद करीत असल्याचे सांगताच चव्हाण यांनी थकीत रक्कम भरण्या करीता सहमती दर्शविली. याच संधीचा फायदा सायबर भामट्याने घेऊन चव्हाण यांच्या मोबाईलवर ईपीके फाईल पाठवली. ही फाईल डाऊनलोड झाल्यानंतर चव्हाण यांना ओटीपी मागितला. त्यानंतर चव्हाण यांनी ओटीपी दिल्यावर त्यांचा मोबाईल बंद करून चव्हाण यांच्या बँक खात्यातून दोन वेळा प्रत्येकी ५- ५ लाख रुपये असे एकुण १० लाख रुपये काढून घेतले. ही रक्कम काढून घेतल्याचा संदेश चव्हाण यांना आला नसल्याने त्यांना काहीसा संशय बळावला.

यावेळी त्यांनी ई मेल तपासल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ५ एप्रिलला २ वेळा ५ - ५ लाख रुपये काढल्याचे दिसून आले. यावरून आपली (Mahavitaran Engineer Fraud) फसवणुक झाल्याचे दिसून येताच राजेशसिंग चव्हाण ९ एप्रिलला हिंगोली शहर पोलिसात तक्रार देऊन १० लाख रुपयाची ऑनलाईन फसवणुक झाल्याचे नमुद केले. यावरून हिंगोली शहर पोलिसात दिपक जोशी मोबाईल ६२००६९२०७५ ७६३४९३ ४९३९ आणि मोबाईल क्र. ९३२४३७००५२ यांच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही फसवणुक ऑनलाईनव्दारे असल्याने हिंगोली शहर पोलिसांनी सायबर सेलची मदत घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप मोदे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026