श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जल्लोषात साजरा

जैन धर्मातील प्रमुख तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मलकापूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव जल्लोषात साजरा

Mahavir Jayanti

भव्य शोभायात्रेत शेकडोंचा सहभाग

मलकापूर (Mahavir Jayanti) : जैन धर्मातील प्रमुख तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मलकापूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जैन समाजाने एकत्र येत हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही “श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव 2026” जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 7 वाजता जैन मंदिर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते भगवान महावीरांची आरती करण्यात आली.

यानंतर भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा जैन मंदिरापासून निघून आत्मानंद दरबार येथे समारोप करण्यात आली. शोभायात्रेत शेकडो महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भक्तिगीते सादर करत, जयघोष करत आणि नाचत-गात नागरिकांनी महोत्सवाचा आनंद लुटला.

या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे चांदीच्या रथावर विराजमान असलेली भगवान महावीरांची प्रतिमा, तसेच भजन-कीर्तन सादर करणारे महिला-पुरुषांचे गट होते. कार्यक्रमादरम्यान गुरुंच्या मुखातून महामंत्र ‘नवकार मंत्रा’चे महत्त्व सांगण्यात आले आणि उपस्थितांना आशीर्वाद देण्यात आला.

महोत्सवाच्या शेवटी सर्वांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिगंबर, श्वेतांबर, मूर्तिपूजक तसेच जैन नवयुवक मंडळाने मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. गुरू व साध्वी यांच्या सान्निध्यात हा उत्सव अत्यंत हर्षोल्हासात पार पडला.

संबंधित सामग्री

हिंगोलीत भारतीय जैन संघटनेची संवाद यात्रा, कुटुंबव्यवस्थेसाठी 10 कलमी कार्यक्रम जाहीर

हिंगोलीत भारतीय जैन संघटनेची संवाद यात्रा, कुटुंबव्यवस्थेसाठी 10 कलमी कार्यक्रम जाहीर

Indian Jain Association: भारतीय जैन संघटनेने कुटुंब व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी 10 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

Aug 20, 2026
मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

“तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

Aug 08, 2026
हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

हिंगोलीत जय जगन्नाथ च्या जयघोषात इस्कॉनचा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न

Jagannath Rath Yatra Festival: इस्कॉन शाखेच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे  आयोजन १९ जुलै रविवार रोजी करण्यात आले. सर्व भक्त-भाविकांनी या उत्सवात हरे कृष्णा  हरे रामा व हरिबोल

Jul 19, 2026
मालाड जिरेटोप प्रकरणावर पडदा; जैन समाजाच्या शिष्टमंडळाची 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफी

मालाड जिरेटोप प्रकरणावर पडदा; जैन समाजाच्या शिष्टमंडळाची 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफी

मुंबईतील मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Jun 26, 2026