राज्य शिष्यवृत्ती परीक्षा

विश्वा पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; अवनीश गरकळ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौदावा!    

State Scholarship Exam: रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील विश्वा पब्लिक स्कूल गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने यशाची नवी शिखरे गाठत आह

विश्वा पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; अवनीश गरकळ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौदावा!    

State Scholarship Exam

रिसोड (State Scholarship Exam) : रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथील विश्वा पब्लिक स्कूल गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने यशाची नवी शिखरे गाठत आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी अवनीश प्रमोद गरकळ याने राज्यातून १४ वा क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सत्कार
स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या हस्ते अवनीशचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

​उपस्थिती: या गौरव सोहळ्यास अवनीशचे आई-वडील श्री. प्रमोद गरकळ व सौ. गरकळ यांच्यासह शाळेच्या प्रतिनिधी म्हणून विश्वा पब्लिक स्कूलच्या कोषाध्यक्ष सौ. मनीषा विश्वनाथजी सानप उपस्थित होत्या.

​मार्गदर्शन आणि यशाचे गमक
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण नियोजन, कठोर परिश्रम आणि विश्वनाथजी सानप यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि कौशल्ये विकसित करण्यावर शाळेचा भर असल्यानेच हे यश शक्य झाल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले. ​अवनीशच्या या उज्ज्वल यशामुळे विश्वा पब्लिक स्कूल, मांगवाडी परिसर आणि संपूर्ण रिसोड तालुक्यातून त्याचे व शाळेचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

संबंधित सामग्री

इशांत राहुल चांभारे ‘नीट’ मध्ये चमकला!

इशांत राहुल चांभारे ‘नीट’ मध्ये चमकला!

NEET Ishant Chambhare: इशांत याने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले असून, त्याने कठीण परिस्थीतून मेहनतीच्या व अभ्यासाच्या भरवशावर हे सुयश संपादन केले आहे. या यशामुळे इशांतचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Jul 20, 2026
रिसोडच्या विश्वा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी गौरी डांगे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत देशात प्रथम

रिसोडच्या विश्वा पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी गौरी डांगे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत देशात प्रथम

National Abacus Competition: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि भक्कम व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरही देशात अव्वल येऊ शकतात, हे रिसोड येथील विश्वा पब्लिक स्कूल

Jul 17, 2026
तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Rani Ingale: पातूरच्या तुळसाबाई कावल विद्यालयातील राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे हिने बारावी आणि बी.टेक पूर्ण केल्यानंतर एमबीएसाठी निवड मिळवून विद्यालयाच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा

Jun 01, 2026
सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव; H.S.C. निकालाची परंपरा कायम

सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगाव; H.S.C. निकालाची परंपरा कायम

सुखदेवानंद उच्च माध्यमिक विद्यालय, भांडेगाव येथील इयत्ता बारावीचा निकाल यंदाही उल्लेखनीय लागला असून संस्थेची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात आली आहे.

May 02, 2026
हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, हिंगणघाट येथील सेजल सुनील जेसवानी हिने वाणिज्य शाखेत 96.35 टक्के गुण मिळवले.

May 02, 2026