Maharashtra Politics

अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावर फडणवीसांचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘पूर्ण भाषण ऐकलं असतं तर...’

अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. जरांगे आंदोलन आणि दिशा सालियन प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.

अमित शाहांच्या हिंदी वक्तव्यावर फडणवीसांचा विरोधकांना टोला; म्हणाले, ‘पूर्ण भाषण ऐकलं असतं तर...’

मनोज जरांगे यांच्या आंदोलनासह दिशा सालियन प्रकरणावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भूमिका

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेबाबतच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाहांचे संपूर्ण भाषण ऐकले असते, तर त्यांच्यावर टीका करण्याची वेळच आली नसती, असा दावा फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत निशाणा साधत, “अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती,” असा टोला लगावला.

नवी मुंबईतील राजभाषा संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदीच्या मुद्द्यावर भूमिका मांडली होती. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. मातृभाषेबरोबर दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली होती. या वक्तव्यानंतर ठाकरे गटातील शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर सूचक पोस्ट केल्याने त्याची चर्चा झाली.

‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर...’

विरोधकांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भूमिका स्पष्ट केली. अमित शाह यांनी महाराष्ट्रात मराठी भाषेचे महत्त्व आणि मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नागरिक बहुभाषिक आहेत, याचा अर्थ त्यांची मातृभाषा बदलते असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या वक्तव्याचा केवळ निवडक भाग ऐकून त्यावर टीका करणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. अमित शाहांचे संपूर्ण भाषण ऐकले असते, तर विरोधकांनी अशी टीका केली नसती, असा दावा त्यांनी केला.

राज ठाकरेंची सूचक पोस्ट चर्चेत

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्या पोस्टचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच...” अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली होती.

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईत राजभाषा संमेलन पार पडले. या कार्यक्रमात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. त्यामुळे राज ठाकरेंच्या पोस्टचा रोख नेमका अमित शाह यांच्या हिंदी संमेलनातील वक्तव्याकडे होता का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर फडणवीस काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे यांनी पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला असून, त्यावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, तर काही प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिशा सालियन प्रकरणावरही प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केली असून त्यात आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

यावेळी फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आपण पाहिलेली नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने एफआयआर दाखल केली असल्याने त्यावर कोणतेही तर्क-वितर्क करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026