Maharashtra Politics

जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Politics

जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून महामार्ग रोखल्याचा आरोप

सांगली : जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराणा प्रताप चौक परिसरात रास्ता रोको करून सरकारच्या विरोधात भाषणे केल्याप्रकरणी दोन माजी आमदार, दोन जिल्हा बँक संचालकांसह एकूण ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जत शहरातील महाराणा प्रताप चौक रस्त्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. जत तालुक्याचे नामांतर करावे तसेच पाण्याचा प्रश्न सोडवावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. तसेच सरकारच्या विरोधात भाषणेही करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडविल्याचा आरोप करत जत पोलिसांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार श्रीशैल बिसलाप्पा वळसंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम २२१, १८९ (२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ (३) तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कारवाईत माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांचा समावेश आहे. त्यांच्यासह माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरदार, माजी सभापती सुजय ऊर्फ नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, शिवसेनेचे अमित ऊर्फ बंटी दुधाळ, नगरसेवक संतोष कोळी, माजी नगरसेवक नीलेश बामणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय युवराज निकम, रवींद्र सावंत, अजिंक्य सावंत, राहुल बाबर, महादेव पाटील, ईरण्णा निडोणी, परशुराम सांगोलकर, प्रकाश माने, बाबासाहेब कोडग, विवेक कोकरे, महांतेश पाटील आणि रासप नेते अजित पाटील यांच्याविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे.

जत तालुक्याचे नामांतर आणि पाण्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, सर्वपक्षीय आंदोलनातील सहभागी नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026