हिंगोली (Police Officer Death) : बासंबा ठाण्यातील पोलिस कर्मचारी मुरलीधर देवबा जाधव हे औंढा नागनाथ येथून बासंबा ठाण्याकडे कर्तव्यावर जात असताना हिवरा शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ येथे श्रावण मास निमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी अनेक ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. ३१ ऑगस्ट ला तिसर्या सोमवार निमित्त रविवारीच बंदोबस्त मागविण्यात आला होता. बासंबा ठाण्यातील मुरलीधर जाधव (५०) यांचाही समावेश होता. बासंबा पोलिस ठाणे हद्दित रविवारी रात्री खुनाची घटना व आरोपीने विषारी औषध पिल्याने बासंबा ठाण्याचा बंदोबस्त औंढा ना. येथून पाठविण्यात आला होता. मुरलीधर देवबा जाधव हे मोटार सायकलवरून मध्यरात्री निघाले होते.
औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर हिवरा शिवारात मोटर सायकलची ट्रकला धडक झाली. यामध्ये मुरलीधर जाधव हे जमिनीवर कोसळले. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. औंढा नागनाथ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन हिंगोलीच्या शासकीय रूग्णालयात जाधव यांना नेले. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
३१ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिव देहास पोलिस प्रशासनाकडून शोक सलामी देण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घटनेबाबत सोमवारी सायंकाळ पर्यंत नोंद झाली नव्हती.
पोलिस कर्मचारी मृत्यू
हिवरा शिवारात अपघातात कर्तव्यावरील पोलिस कर्मचार्याचा मृत्यू
Police Officer Death:
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Police Officer Death
टैग्स:
Police Officer Death
polic officer death accident
carthawar hivar
shivar road accident
car accident in maharashtra police officer fatality
Mumbai police officer
killed in highway crash
संबंधित सामग्री
हिंगोलीत पोलिस उपनिरीक्षकाचा रेल्वेने कटलेला आढळला मृतदेह
PSI Amol Gangalwad: खटकाळी भागाकडे जाणार्या रेल्वे उड्डानपुलाखाली शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा रेल्वेने कटलेल्या अवस्थेत मृतदेह
Aug 30, 2026
औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्याचा मृत्यू
Aundha Nagnath Police Death: औंढा नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून काम करणारा पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याने मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत
May 25, 2026