हिंगोली पोलिस कामगिरी

पोलिसांच्या कामगिरीत १८ लाखांचे १०१ मोबाईलचा लावला शोध; दै. देशोन्नतीचा अंदाज तंतोतंत ठरला खरा

Hingoli Police Action: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले १०१ अँड्रॉइड मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केल्याची घोषणा केली आहे.

पोलिसांच्या कामगिरीत १८ लाखांचे १०१ मोबाईलचा लावला शोध; दै. देशोन्नतीचा अंदाज तंतोतंत ठरला खरा

Hingoli Police Action

हिंगोली (Hingoli Police Action) : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले १०१ अँड्रॉइड मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केल्याची घोषणा केली आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून हे मोबाईल हिंगोलीसह इतर जिल्हे आणि परराज्यातूनही रिकव्हर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. १५ ऑगस्टला पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले.

मात्र या (Hingoli Police Action) घोषणेनंतर पोलिसांच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी मोठ्या आकडेवारीसह प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दैनिक देशोन्नतीने याआधीच अशा प्रकारच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला होता आणि तो आज खरा ठरल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारदर्शकता. पोलिसांनी १०१ मोबाईल ताब्यात घेतले हे मान्य, परंतु हे मोबाईल नेमके कोणाकडून जप्त करण्यात आले, त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गहाळ झालेले मोबाईल हे चोरांकडून, विक्रेत्यांकडून सापडले की अन्य मार्गाने मिळाले, हेही स्पष्ट झालेले नाही. काही मोबाईल हे आधीच इतरांना विक्री झाले होते असेही बोलले जात आहे. मग ते खरेदी करणार्‍यांची चौकशी झाली का, त्यांच्यावर कारवाई झाली का, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्याने त्यांचा आनंद स्वाभाविक आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांची भूमिका कितपत पारदर्शक होती याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे. रस्त्यावर सापडलेले मोबाईलही रिकव्हरीत दाखवले गेले आहेत का, असा प्रश्नही विचारला जात आहे.  मोठ्या घोषणा करण्यापेक्षा केलेल्या कारवाईचा तपशील जनतेसमोर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा कामगिरीकडे केवळ देखावा म्हणून पाहिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष घालून संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

संबंधित सामग्री

चोरीच्या घटनेतील मुद्देमाल फिर्यादीस औंढा नागनाथ पोलिसांनी केला परत

चोरीच्या घटनेतील मुद्देमाल फिर्यादीस औंढा नागनाथ पोलिसांनी केला परत

Aundha Nagnath Theft: जवळा बाजार परिसरातील बारचे अज्ञात चोरट्याने सेटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेल्याची घटना प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

Jul 14, 2026
३.५ लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत! 

३.५ लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत! 

Latur Police: सदर बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस व झुमके असल्याचे आढळून आले. घटनास्थळी व परिसरात तात्काळ चौकशी

Jun 22, 2026