ग्रामपंचायत बायोमेट्रिक

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हजेरीला आता जीपीएस आणि बोटांचे ठसे बंधनकारक! शासनाचा दणका, टाळाटाळ संपणार

Gram Panchayat Biometric:

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हजेरीला आता जीपीएस आणि बोटांचे ठसे बंधनकारक! शासनाचा दणका, टाळाटाळ संपणार

Gram Panchayat Biometric

सुधीर गोगटे
हिंगोली (Gram Panchayat Biometric) : 
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी आणि शासकीय योजनांची कामे जलदगतीने व्हावीत यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी ही पारंपरिक पद्धतीने न होता थेट जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवली जाणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत.

ग्रामविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र काढून याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी १० डिसेंबर २०२४ रोजीही ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच पूर्वीचे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांची बायोमेट्रिक (Gram Panchayat Biometric) आणि जीपीएस हजेरी प्रणाली सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या.

त्यामुळेच आता शासनाने पुन्हा एकदा आपल्या स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती आता केवळ हजेरीपटावर न नोंदवता ती बायोमेट्रिक यंत्र आणि जीपीएस प्रणालीच्या साहाय्याने नोंदवावी.

या (Gram Panchayat Biometric) निर्णयामागे मुख्य उद्देश पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक वेळेवर कार्यालयात येत नाहीत, गावात फिरत नाहीत आणि नागरिकांची कामे रखडतात अशा तक्रारी येत असतात. बायोमेट्रिक हजेरीमुळे कोणत्या वेळी अधिकारी आले आणि गेले याची अचूक नोंद राहील. तसेच जीपीएसच्या माध्यमातून ते कोणत्या ग्रामपंचायत क्षेत्रात उपस्थित आहेत याचीही माहिती मिळेल. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्यांवर आळा बसेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी नितीन स. पवार यांच्या स्वाक्षरीने हे पत्र सर्व जिल्हा परिषदांना पाठवण्यात आले आहे. याची प्रत सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदांना या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

ग्रामपंचायत पातळीवर (Gram Panchayat Biometric) राबणाऱ्या विविध योजना, दाखले वाटप, विकासकामे यासाठी ग्रामपंचायत अधिकारी हेच मुख्य दुवा आहेत. त्यांची नियमित उपस्थिती असेल तर गावाचा विकास जलद होईल अशी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गैरहजेरी आणि चुकीच्या नोंदींना पूर्णविराम मिळणार आहे.

आता या शासकीय आदेशानंतर राज्यभरातील जिल्हा परिषदा किती लवकर ही यंत्रणा सुरू करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

संबंधित सामग्री

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलण्याची तयारी

पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा व्यवस्था बदलण्याची तयारी

Paper Leaks Task Force: केंद्र सरकारच्या 6 सदस्यीय उच्चाधिकार टास्क फोर्सने सार्वजनिक परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था

Aug 30, 2026
आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Aug 30, 2026
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता GPS व बायोमेट्रिकद्वारेच...

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता GPS व बायोमेट्रिकद्वारेच...

Gram Panchayat Biometric: ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची हजेरी आता अनिवार्यपणे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवण्यात यावी, असे निर्देश

Aug 19, 2026
अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

पातूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.

Aug 14, 2026