राम नामाचा गजर

श्रीराम जन्मोत्स गुरूवारी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

राम नामाचा गजर

Lord Ram Celebration

रामनवमी निमित्ताने रामभक्तांनी फुलले शहरातील रस्ते

यवतमाळ (Lord Ram Celebration) : श्रीराम जन्मोत्स गुरूवारी भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच राममंदिरात दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी होती. तर सायंकाळच्या शोभायात्रेत भक्तीसागर लोटला होता. हिंदु पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नववी तिथीला रामनवमी उत्सव साजरा केल्या जातो. त्यानुसार २६ मार्च रोजी रामनवमी उत्सव प्रभु श्रीरामांची पुजा अर्चा करून भक्तीभावाने हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.यावेळी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सायंकाळच्या वेळी भव्य शोभायात्राही काढण्यात आल्या होत्या.

यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने रामनामाच्या गजरात आसमंत दुमदुमला. जिल्ह्यात  राम मंदीरांमध्ये प्रभु श्रीराम यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रिघ लागली होती. जिल्ह्यात ठिकठिकणी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली,यावेळी भव्यदिव्य अशा भगव्या पताका आसमंतात फडकवित प्रभु श्रीरामाचा जयकार करण्यात  आला.दुपारी १२ वाजता  राम  मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.    

जय हिंद चौकातील श्री राम मंदिरातून श्रीराम, माता सीता, आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून रामनवमीच्या भव्य शोभायात्रेला  दुपारी ४ वाजता प्रारंभ करण्यात आला. रामनवमी शोभायात्रेत दक्षिणात्य शैलीच्या कलाकृतीत साकारण्यात आलेल्या आकर्षक व सुशोभित रामरथात हा रामदरबार विराजित करण्यात आला होता. रामभक्त शोभायात्रा मार्गावरून हाताने हा रामरथ ओढत होते. शोभायात्रेमध्ये महाराष्ट्रातील लोककला तसेच पौराणिक कथांवरील जिवंत देखाव्यांचे सादरीकरण  करण्यात आले. महिला, पुरुष,आबालवृद्ध सहभागी असणार्‍या या सर्वसमावेशक शोभायात्रेत यंदाचे मुख्य आकर्षण असलेल्या भोलेनाथाची मुर्ती आणि दुर्गा मातेची वाघावर विराजमान मुर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच सामाजिक प्रबोधन करणार्‍या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणार्‍या १०० हुन अधिक झॉक्याचा शोभायात्रेमध्ये समावेश होता. शोभायात्रेमध्ये ठिकठिकाणी महाप्रसाद, मसाले भात, फराळ, जलपेयाची सामाजीक संस्थांमार्फत व्यवस्था करण्यात आली होती.

संबंधित सामग्री

ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल; श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधनसह जाणून घ्या संपूर्ण व्रत-उत्सवांचे वेळापत्रक

ऑगस्टमध्ये सणांची रेलचेल; श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधनसह जाणून घ्या संपूर्ण व्रत-उत्सवांचे वेळापत्रक

धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेला ऑगस्ट २०२६ महिना यंदा विविध व्रत, उपवास आणि सण-उत्सवांनी गजबजलेला असणार आहे.

Aug 02, 2026
सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Somnath Temple: सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या आत्म्याचे प्रतीक

May 12, 2026
मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य

मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य

टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Apr 05, 2026
श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह 

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह 

Shri Ram Navami: टेकाडीत श्री हनुमान मंदिरात श्रीराम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजनात आहे, सहभागी भजन मंडळांसह विविध कार्यक्रमांचे ठिकाण.

Mar 30, 2026
भजन कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी

भजन कीर्तन, महाप्रसाद, शोभायात्रेने तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्साहात साजरी

Shri Ram Navami Utsav: सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .

Mar 29, 2026