लातूर आंदोलन

लातूरमध्ये कव्हेकरांचे अनोखे आंदोलन! 

Latur Andolan: लातूरमध्ये भाजपाने महापालिकेविरोधात आंदोलन केले. दूषित पाणीपुरवठा व बससेवा बंदीच्या निषेधार्थ देशमुखांच्या पोस्टरला पिवळ्या पाण्याची माळ घातली.

लातूरमध्ये कव्हेकरांचे अनोखे आंदोलन! 

Latur Andolan

देशमुखांच्या पोस्टरला घातली पिवळ्या पाणी बाटल्यांची माळ!

लातूर (Latur Andolan) : काँग्रेसने मनपाची सत्ता मिळवताच टक्केवारीसाठी शहराच्या विकासकामात खोडा घालण्याचे काम केले. लातूर व लातूरकरांशी काहीच देणे घेणे नसलेल्या मनपातील निष्क्रिय सत्ताधाऱ्यामुळे लातूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून शहर बससेवाही देयक दिले नसल्यामुळे बंद पडल्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवारी लातूर महापालिकेत आंदोलन केले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदाराने देशमुख यांच्या पोस्टरला नळाला आलेल्या पिवळ्या पाण्याने भरलेल्या बाटल्यांची माळ घालत निषेध नोंदविला.

आमदार व त्यांच्या मनपातील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून लातूरकरांना वेठीस धरण्याचे काम होत असल्याचा आरोप करत शहरातील प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी दिला. (Latur Andolan) कव्हेकरांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा भाजपाच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देविदास काळे, अ‍ॅड. दीपक मठपती, सरचिटणीस संजय गिर, प्रविण कस्तुरे आदी सहभागी होते.

धनेगाव धरणात मुबलक पाणी उपलब्ध असूनही शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून तोही दूषित होत आहे. आहे. यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याचे सांगून लातूर शहराला योग्य वेळेत व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी अजित पाटील कव्हेकर यांनी केली. शहर बससेवेचे देयक अदा न झाल्यामुळे ही सेवाही बंद झाली असल्याने सर्वसामान्य लातूरकरांना मोठी आर्थिक झळ बसून गैरसोय होवू लागली आहे. विशेष म्हणजे महिलांना बससेवा मोफत असल्याचा डांगोरा काँग्रेसकडून केला जातो. वास्तविक शहरातील सर्वच महिलांना मोफत बससेवा मिळत नसल्याचा दावा करत ही मोफत बससेवा शहरातील प्रत्येक महिलेला मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सदर मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास महापालिकेच्या समोरच ७२ तास उपोषण करण्यात येईल, असा इशाराही  कव्हेकर यांनी यावेळी दिला. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराचे निष्क्रिय आमदार व मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या (Latur Andolan) आंदोलनात रविशंकर जाधव, शोभाताई पाटील, शिला पाटील, विनय जाकते, ऋषिकेश राजे, गणेश गवारे, भीमाशंकर बेंबळकर, ज्योती आवस्कर, मंडळ अध्यक्ष राहुल पाटील, सुरेश जाधव, राहुल भूतडा, निर्मलाताई कांबळे, ओम धरणे, पवन आल्टे, मुन्ना हाशमी, किशन बडगिरे, लक्ष्मण खरटमोल, प्रमोद गुडे, किशोर शिंदे, शिक्षक आघाडी प्रमुख मारुती सूर्यवंशी यांच्यास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026